Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
मोठा वाघोदा येथील रहिवासी प्रविण कल्पना सुभाष वानखेडे या तरुणाचे येत्या 28 फेब्रुवारीला "जिप्सीनामा" हे पुस्तक प्रकाशित होत आहे.
मोठा वाघोदा येथील रहिवासी प्रविण कल्पना सुभाष वानखेडे या तरुणाचे येत्या 28 फेब्रुवारीला "जिप्सीनामा" हे पुस्तक प्रकाशित होत आहे.
मोठा वाघोदा ता.रावेर मोठा वाघोदा येथील रहिवासी प्रविण कल्पना सुभाष वानखेडे या तरुणाचे येत्या 28 फेब्रुवारीला "जिप्सीनामा" हे पुस्तक प्रकाशित होत आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतुन आपले शिक्षण पूर्ण करून त्याने आपले हे स्वप्न पूर्ण केले आहे. त्याने आपले मास्टर्स इन डेवलोपमेंट अजीम प्रेमजी विश्वविद्यालय बंगलोर येथून पूर्ण केले असून तो सध्या बिहारमधील लखीसराय जिल्ह्यात कार्यरत आहे.
“जिप्सीनामा” हे हिंदी कथा संग्रह असून त्याला त्याच्या प्रवासात भेटलेल्या व्यक्तींविषयी यात सत्यकथा चितारल्या आहेत. ज्या सामाजिक असमतोल, सामाजिक समस्या, जसे की भूक, शेतकरी आत्महत्या, मानसिक दडपण, दुष्काळ आदींविषयी आपणास ग्रामीण भारत आणि त्यात होरपळून निघालेल्या व्यक्तींविषयी माहिती देण्यास व त्यांचे जीवन क्षणभर का होईना जगण्यास मदत करतील.
यासोबतच काही दिवसांपूर्वी प्रविणला नॅशनल जिओग्राफिक सोसायटीचा सर्टिफाइड एज्युकेटर चा बॅच मिळाला असून भविष्यात नॅशनल जिओग्राफी सोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. गरीब व हलाखीच्या परिस्थितीतून शिक्षण घेऊन अभिमानास्पद कार्य केल्याने मोठा वाघोदा येथील सर्वधर्मीय गावकऱ्यांतर्फे त्याचे कौतुक होत आहे.
"जिप्सीनामा" हे सध्या प्री-ऑर्डरसाठी ऑनलाईन उपलब्ध असून आपण www.bookscamel.com या वेबसाईटवर जाऊन ते विकत घेऊ शकता. यासोबतच 28 फेब्रुवारीपासून हे पुस्तक अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि इतर आंतरराष्ट्रीय संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.
जर आपणास पुस्तक मागवायचे असेल तर कृपया पंकज गुरव, जळगाव 9765707758 यावर आपण संपर्क करू शकता.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा