Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२०

मोबाईल विषयी माझे मत.......



प्रतिनिधी:आजच्या विज्ञान युगात आपण बघत आहोत विणण्याचे जोरावर मनुष्य कुठपर्यंत पोहोचला आहे. नाना प्रकारची कामे अगदी सहजपणे तो मोबाईल मुळे करत आहे. मोबाईल मुळे मनुष्य अगदी आळशी होत चालला आहे.

आपल्याला सहजपणे चाळीस किंवा पन्नास वर्षाच्या व्यक्ती सांगतो की आम्ही सगळे काढून मेहनतीने व कष्टाने करायचे. कबड्डी, खो-खो,विटी दांडू यांसारखे खेळ खेळायचो हो मजा करायचो या सर्व गोष्टी बंद पडायला फक्त मोबाईल कारणीभूत आहे.

या सर्व गोष्टी मोबाईल हरवून ठेवलेले आहेत असे म्हणण्यास काही हरकत नाही.
आपण बघतो की मोबाईल शिवाय कोणीही राहू शकत नाही.ज्याप्रमाणे आंघोळ झाली की आपण कपडे घालण्याशिवाय राहू शकत नाही. अगदी सकाळपासून ते रात्री झोपण्याच्या सेकंदापर्यंत मनुष्य मोबाईल आपल्या जवळ ठेवतो.

मानवानी एका मानवाप्रमाणे विवाह करणे सोडून दिले आहे, एकमेकांची समोरासमोर बसून बोलणे बंद झाले आहे माझ्यामते तरी या सर्व गोष्टींचा आढावा फक्त आणि फक्त मोबाईल आहे.

आज कालचे आई वडील लहान मुल रडत असतांना किंवा अभ्यास न करत असतांना त्याला समजूत घालण्यासाठी मोबाईलचे आमिष दाखवतात किंवा मोबाईल देतात आणि त्यावेळी त्या मुलाच्या आई-वडिलांना ना ना प्रकारची कामे सुचतात या सर्व गोष्टीवर आईवडिलांनी लक्ष द्यायला हवे.

आजच्या युगात पाच ते दहा वर्षाच्या बालकांना चष्मा घालावा लागत आहे. फक्त मोबाईल मुळे पूर्वीचे व्यक्ती एखाद्याला चाळीस-पन्नास वर्षाच्या व्यक्तीला चष्मा घातलेला दिसायच्या याचे कारण माझ्यामते फक्त मोबाईल आहे. अजून एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो की आपण एखाद्या कार्यक्रमात अथवा पर्यटन ठिकाणी जाऊन त्या गोष्टीकडे लक्ष न देता पूर्णवेळ आपण सेल्फी व्हिडिओ कडे देत आहोत याकडे जरा बारकाईने लक्ष द्यायला हवे. बरेचसे आपले मित्र सेल्फी काढताना किंवा टिकटॉक व्हिडिओ बनवताना त्यांनी आपला जीव मात्र गमावलेला आहे मित्रांनो असे आपल्याला अनेक माध्यमांकडून पाहण्यात किंवा ऐकण्यात आले आहे. याकडे जरा बारकाईने लक्ष द्या मित्रांनो मोबाईल मुळे सेल्फी काढताना किंवा व्हिडिओ काढताना आपल्या जीवाला काही विजा होणार नाही याकडे जरा लक्ष द्या. तरुणांनी जरी आपला कामधंदा करून थोडावेळ मोबाईल कडे मनोरंजनाने किंवा गरजेपुरते बघितले तर चांगले आहे व आजच्या पिढीच्या बालकांना मोबाईल देणे योग्य आहे का त्याच्या पालकांनी त्यांच्या भविष्यासाठी? असा प्रश्न मला पडत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध