Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ३ फेब्रुवारी, २०२०

होमी भाभा सेंटर मुंबई कडून आठ शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत शिरपूर येथे आर सी पटेल व एच आर पटेल विद्यालयात दि. 4 ते 7 फेब्रुवारी दरम्यान चार दिवसीय कार्यशाळेचे आयोजन




शिरपूर:प्रतिनिधी: होमी भाभा सेंटर मुंबई कडून आठ शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत शिरपूर येथे आर. सी. पटेल व एच. आर. पटेल माध्यमिक विद्यालयात दि. 4 ते 7 फेब्रुवारी दरम्यान चार दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले 

आहे.आर.सी. पटेल व एच.आर.पटेल विद्यालयातील अटल टींकरींग लॅब मध्ये शिरपूर तालुक्यातील सर्व ९ अटल शाळा व इतर ३ असे एकूण १२ शाळांमधील १२० विद्यार्थ्यांसाठी होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्यूकेशन व टाटा इन्सिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च सेंटर मुंबई यांच्या मार्फत "प्रोजेक्टबेस लर्निंग फॉर स्टेम गेम्स" या कार्यशाळेचे दि. ४ ते ७ फेब्रुवारी २०२० या कालावधीत आयोजन केले आहे.

शिरपुर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री अमरिशभाई पटेल, आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्ट अध्यक्ष भुपेशभाई पटेल, संस्था उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सीईओ डॉ.उमेश शर्मा यांच्या 

मार्गदर्शनाखाली आयोजन केले आहे.सदर कार्यशाळेचे उद्घाटन राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमीशन मुंबईचे सिनीअर सायन्टिफिक अॉफीसर डॉ.सुनील थोरात, होमीभाभा चे प्रमूख प्रा. नागार्जुन जी. यांच्या हस्ते दि. ४ .२.२०२० रोजी सकाळी ११ वाजता एस.एम.पटेल ऑडिटोरिम हॉल येथे चार दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन होईल. 

या ४ दिवशीय कार्यशाळे दरम्यान धुळे जिल्यातील इतर शाळांना सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत भेट देता येणार आहे. भाभा सेंटरचे आठ शास्त्रज्ञ चार दिवस प्रशिक्षण देतील. यावेळी शास्त्रज्ञ डॉ. सुनील थोरात, नागार्जुन जी., विनोद सोनवणे, जुडे डिसोजा, रवी सिन्हा, आशिष कुमार परदेशी, सुरेंद्र पाटील, सोहम दिघे हे आठ दिवस उपस्थित राहतील.कार्यशाळेचे आयोजन एच. आर. पटेल फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. बारी, प्रा. विवेकानंद चटप यांचे देखील सहयोगाने होत आहे.या चार दिवसीय कार्यशाळेचा लाभ घेण्याचे आवाहन प्राचार्य पी. व्ही. पाटील, प्राचार्य आर. बी. पाटील यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध