Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ३ फेब्रुवारी, २०२०

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटना पनवेल.





पनवेल:प्रतिनिधी:आशा स्वयंसेविका व गटप्रर्वतक भगिनींनो, आपल्या संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. 02. 02. 2020 वार रविवार रोजी सकाळी 11.00 वाजता आगरी शिक्षण संस्था, प्लॉट नंबर 12अ/ब,सेक्टर-6, खांदा कॉलनी,नवीन पनवेल जि.रायगड येथे आयोजित करण्यात आली होती. सदर सभेस राज्यातील विविध जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांची उपस्थीती लाभली.
   
सभेमध्ये खालील विषयांवर चर्चा करण्यात आली...

दि. १६ /०९ /२०१९ रोजीच्या शासन आदेशानुसार आशा स्वयंसेविकांना रुपये २००० केलेली मानधनवाढ प्रत्यक्ष लागु झालेली नाही. सदर मानधनवाढ पुर्वलक्षी प्रभावाने लागु करुन दरमहा मिळण्यासाठी अर्थसंकल्पिय अधिवेशन काळात मुंबई येथे राज्यव्यापी आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले. 

तसेच गटप्रवर्तकांना आशा स्वयंसेविकांच्या धर्तीवर मानधनवाढ लागु करण्यात यावी.

यासह अन्य मागण्यांवर तसेच आगामी काळातील आंदोलनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच खालील प्रमाणे राज्य कार्यकारणीची एकमताने निवड करण्यात आली...

राज्यकार्यकारणी 
अध्यक्षा-  मायाताई परमेश्वर, 
सरचिटणीस - ॲड. गजानन थळे,
कार्याध्यक्ष - रामकृष्ण बी. पाटील,
उपाध्यक्ष - युवराज बैसाणे, 
कोषाध्यक्ष - सुधीर परमेश्वर,
सचिव - दत्ता जगताप, 
सचिव - सुमंत कदम, 
संघटक सचिव - अमोल बैसाणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध