Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ३ फेब्रुवारी, २०२०

पटेल परिवाराकडून सांगवी येथील घर जळालेल्या रामलाल पावरा यांच्या कुटुंबाला 4 महिन्यांचा किराणा, संसारोपयोगी वस्तू वाटप




शिरपूर:प्रतिनिधी:माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, नगरसेवक तपनभाई पटेलया संपूर्ण पटेल परिवाराकडून सांगवी येथील घर जळालेल्या रामलाल पावरा यांच्या कुटुंबाला 4 महिन्यांचा किराणा, संसारोपयोगी वस्तू वाटप करण्यात आले.

 गेल्या दोन दिवसांपूर्वी दि. 31 जानेवारी दुपारी 12.30 वाजता रामलाल दाद्या पावरा यांच्या सांगवी शिवारातील  शेतातील घरास आग लागल्याने शेतीमाल व घरातील सर्व उपयोगी सामान जळुन राख झाला. 

रामलाल पावरा यांच्या कुटुंबावार संकट कोसळले. अशा त्यांच्या बिकट परिस्थितीत भुपेशभाई पटेल व संपूर्ण पटेल परिवाराने मदतीचा हात पुढे करत रामलाल पावरा व त्यांच्या कुटुंबियांना पुढील उदरनिर्वाहासाठी उपयोगी पडेल असे चार महिन्यांचा किराणा माल व संसारोपयोगी पडणारा सर्व सामान वस्तु त्यांना स्वखर्चाने घरपोहच केल्या. त्या कुटुंबाला दिलासा देत त्यांचे सात्वन केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध