Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ३ फेब्रुवारी, २०२०
क्रूझर व डंपरच्या भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू
जळगाव (प्रतिनिधी) यावल तालुक्यातील हिंगोणा गावानजीक क्रूझर व डंपर यांच्यात रविवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 12 प्रवासी ठार झाले असून 7 जण जखमी झाले आहेत.
चोपडा येथे लग्नाचे रिसेप्शन आटोपल्यानंतर परतत असताना ही घटना घडली. मृतांमध्ये सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती मिळत आहे. मृत्यू झालेले 7 प्रवासी चिंचोल ता. मुक्ताईनगर येथील तर 3 निबोल ता. रावेर येथील रहिवासी आहेत.
महाजन आणि चौधरी कुटुंबातील लोक रात्री बारा ते साडेबारा दरम्यान मुक्ताईनगर येथून कौटुंबिक कार्यक्रम आटोपून निघाले होते. दरम्यान प्रवासातच क्रूझर आणि डंपरची भीषण धडक होऊन हा अपघात झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. जखमींना यावल मधून जळगावमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
मृतांची नावे :मंगलाबाई ज्ञानेश्वर चौधरी (वय 65), प्रभाकर नारायण चौधरी (वय 60), अश्लेषा उमेश चौधरी (वय 28), रिया जितेंद्र चौधरी (वय 14), प्रभाबाई प्रभाकर चौधरी (वय 40), सोनाली जितेंद्र चौधरी (वय 34), प्रियंका नितीन चौधरी (वय 28), सर्व रा. चिंचोल ता. मुक्ताईनगर तर सोनाली सचिन महाजन (वय 34 रा. चांगदेव ता. मुक्ताईनगर), सुमनबाई श्रीराम पाटील (वय 55 रा. निंबोल ता. रावेर), संगीता मुकेश पाटील (रा. निंबोल ता. रावेर)
जखमींची नावे :धनराज गंभीर कोळी (वाहन चालक), सर्वेश नितीन चौधरी (वय 9), शिवम प्रभाकर चौधरी (वय 13), सुनिता राजाराम पाटील (वय 45), मीना प्रफुल्ल चौधरी (वय 30) सर्व राहणार चिंचोल ता. मुक्ताईनगर आणि अदिती मुकेश पाटील (वय 14 रा निंबोल ता. रावेर).
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...
-
नाशिक प्रतिनिधी : शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला धुळे येथील प्रशांत वाडिले या...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा