Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
आर. सी. पटेल मेडिकल फाऊंडेशन च्या वतीने दि. 8 फेब्रुवारी रोजी वरूळ येथे दोन अत्याधुनिक ॲम्बुलन्स चे (रुग्णवाहिकांचे) नामकरण व लोकार्पण
आर. सी. पटेल मेडिकल फाऊंडेशन च्या वतीने दि. 8 फेब्रुवारी रोजी वरूळ येथे दोन अत्याधुनिक ॲम्बुलन्स चे (रुग्णवाहिकांचे) नामकरण व लोकार्पण
शिरपूर:प्रतिनिधी:महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री अमरिशभाई पटेल, तालुक्याचे आमदार काशीराम पावरा, शिरपूरचे उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगरसेवक तपनभाई पटेल यांच्या प्रयत्नाने तसेच आर. सी. पटेल मेडिकल फाऊंडेशन च्या वतीने दोन अत्याधुनिक ॲम्बुलन्स चे (रुग्णवाहिकांचे) नामकरण व लोकार्पण शनिवार दि. 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.30 तीस वाजता वरुळ येथील आर. सी. पटेल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये करण्यात येत आहे.
शिरपूर तालुक्यातील गरजू व सर्वसामान्य तसेच सर्व नागरिकांच्या दृष्टीने अत्यावश्यक सेवा म्हणून पटेल परिवाराने गेल्या अनेक वर्षांपासून दोन अत्याधुनिक कार्डियाक रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत उपलब्ध केल्या आहेत. शिरपूर शहर व तालुक्याची वाढती लोकसंख्या तसेच इतर गंभीर आजारांची मोठी संख्या लक्षात घेता पुन्हा दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्याचे पटेल परिवाराने निश्चित केले आहे.
वरुळ येथील आर. सी. पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शनिवारी दि. 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.30 वाजता तालुक्याचे आमदार काशीराम पावरा यांच्या हस्ते जीवन रक्षक व आरोग्य रक्षक या दोन रुग्णवाहिकांचे नामकरण व लोकार्पण करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा शिरपूरचे उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल हे राहतील. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी दिपप्रज्वलन जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. तुषार रंधे हे करतील. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती तथा शिरपूर नगरपालिकेचे बांधकाम सभापती तपनभाई पटेल, पंचायत समिती सदस्य डॉ. शशिकांत पाटील, पंचायत समिती सदस्य सौ. विनिताबाई पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील.
या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आर. सी. पटेल मेडिकल फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा