Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०२०

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटना.पनवेल.




प्रतिनिधी:दि.03 फेब्रुवारी 2020 रोजी आशा स्वयंसेविका व गटप्रर्वतकांच्या प्रलंबित मागण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उपसचिव श्रीमती भरोसे मॅडम आणि श्री. अनिल नक्शिने, राज्य समन्वयक आशा योजना यांची आपल्या संघटनेच्या शिष्टमंडळाने त्यांच्या दालनात भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. सदर चर्चेत.....
आशा स्वयंसेविका दि. 16. 09. 2019 रोजीच्या शासकीय आदेशानुसार 2000/- रुपये मानधनवाढ लागू करून मागील थकबाकी विनाविलंब अदा करण्यात यावी. 
आशा स्वयंसेविकांच्या धर्तीवर गटप्रवर्तकांना सप्टेंबर 2019 पासून मानधन देण्यात यावी. 
आशांना मिळणाऱ्या कामाच्या मोबदल्यात वाढ करण्यात यावी, मोबाईल रिचार्ज, गणेश, सादिलखर्च या रकमांमध्ये वाढ करण्यात यावी.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर आशा व गटप्रवर्तकांना भाऊबीज देण्यात यावी. 
यावर शासकीय आदेशानुसार मानधनवाढीसाठी लागणाऱ्या निधीचा प्रस्ताव लवकरच मंजूर होण्यासाठी शासन स्तरावर विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच सन 2020-2021 चा पीआयपी मध्ये आशा व गटप्रर्वतक यांच्या मोबदलासह इतर बाबींवर शासन सकारात्मक आहे. 
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्यातील कामाची गती वाढविण्यासाठी सर्व आशा व गटप्रवर्तकांना मोबाईल हँडसेट पुरविणेबाबत शासन विचार करीत आहे. आशा व गटप्रवर्तकांच्या मागण्याबाबत शासन सकारात्मक विचार करत आहेत. असे सांगण्यात आले.
संघटनेने केलेल्या पाठपुराव्यामुळे आशा व गटप्रवर्तकांचे अनेक प्रश्न मार्गी लागत असून उर्वरित प्रश्न व मागण्या सोडविण्यासाठी संघटना प्रयत्नशील आहे. 
म्हणून राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी आपल्या हक्कांसाठी प्रभावीपणे काम करणाऱ्या व चिवटपणे लढा देणाऱ्या संघटनेचे हात आणखी मजबूत करावेत. असे आवाहन करीत आहोत.
मायाताई परमेश्वर, रामकृष्ण बी. पाटील, युवराज बैसाणे, ॲड. गजानन थळे, दत्ता जगताप, सुमंत कदम, सुधीर परमेश्वर, अमोल बैसाणे, सर्व संघटना पदाधिकारी व कार्यकर्ते...


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध