Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२०

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना पनवेल



मा. मंत्री, यशोमती ठाकुर, महिला व बाल विकास यांच्यासोबत संघटनेची सकारात्मक चर्चा... 
संघटनेच्या दिनदर्शीकेचे मा. मंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन...
आज दि. 24. 02. 2020 रोजी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री मा. ना. श्रीमती यशोमतीताई ठाकूर यांची आपल्या संघटनेसोबत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या खालील प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा केली.

प्रमुख मागण्या

१)अंगणवाडी सेविका, मदतनिस व मिनी अंगणवाडी सेविकांना ऑक्टोबर 2018 ते जुलै 2019 या कालावधीतील मानधनवाढीची थकीत रक्कम तात्काळ देण्यात यावी.

२)दि. 21 जुन 2019 रोजी झालेल्या चर्चेनुसार सेविका, मदतनिस व मिनी अंगणवाडी सेविकांना मानधनाच्या निम्मे रक्कम सेवानिवृत्त पेन्शन म्हणून देण्यात यावी.

३)गोवा,पाँडेचरी, हरियाणा, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ, मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश या राज्यात मिळणाऱ्या मानधनाच्या धर्तीवर राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनवाढ करण्यात यावी.

४)राज्य सरकारच्या नियोजित समान किमान कार्यक्रमानुसार भरीव मानधनवाढ देण्याचा निर्णय विनाविलंब घेण्यात यावा.

५)अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पुर्णवेळ ( ८ तास ) काम देऊन शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन, भत्ते व सेवेचे फायदे देण्यात यावे. 

मिनी अंगणवाडी सेविकांना नियमित सेविकांप्रमाणे मानधन व इतर फायदे लागू करण्यात यावेत.

६)शासन आदेशानुसार अंगणवाडी केंद्राचे वाढीव घरभाडे तातडीने लागू करण्यात यावे.

७)मोबाईल दुरूस्तीचा खर्च करण्याची जबाबदारी शासनाने घ्यावी तसेच चोरी गेलेल्या मोबाईलची भरपाई अंगणवाडी सेविकांकडून करण्यात येऊ नये.

८)मोबाईल रिचार्जची रक्कम वाढीव दराने मागील फरकांसह अदा करण्यात यावी.

९)राजिनामा दिलेल्या,सेवानिवृत्त,म्रुत्यु झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना थकीत एकरकमी सेवासमाप्ती लाभ तात्काळ देण्यात यावेत.

१०)अंगणवाडी सेविका,मदतनिस व मिनी अंगणवाडी सेविकांना देण्यात येणाऱ्या सेवासमाप्ती लाभात तिप्पट वाढ करण्यात यावी.

यासह अन्य प्रलंबित मागण्याबाबत मा. मंत्रीमहोदयांनी सविस्तर चर्चा केली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत निर्णय घेण्यासाठी शासन सकारात्मक आहे व विधानसभेचे अर्थ संकल्पिय अधिवेशन सुरू असल्यामुळे निर्णय करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल मा. मंत्रीमहोदयांनी बैठकीत सांगितले. 

 बैठकीच्या सुरूवातीला आपल्या संघटनेने छापलेल्या सन 2020 च्या दिनदर्शिकेचे मा. मंत्रीमहोदयांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. सदर बैठकीत संघटनेच्या अध्यक्षा मायाताई परमेश्वर, कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील, युवराज बैसाणे, सुधीर परमेश्वर, अमोल बैसाणे आदींनी सहभाग घेतला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध