Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२०

युवा नेतृत्व व सामाजिक विकास प्रशिक्षणास सुरूवात


प्रतिनिधी:भारत सरकार च्या नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद यांच्या माध्यमातून तुळजापूर तालुक्यातील शासकीय तंत्र प्रशाला केंद्र तुळजापूर येथे तीन दिवसीय युवा नेतृत्व व सामाजिक विकास प्रशिक्षण या कार्यक्रम महाविद्यालयाचे नाईकवाडे सर, यांच्या अध्यक्षतेखाली सर्वप्रथम युवकांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन प्रमुख पाहुणे कापसे सर, पत्रकार पुरूषोत्तम बेले, हेमंत इंदापुरकर, करंडे सर, अशोक गडकर, यांचे हस्ते करण्यात आले. प्रतिमा पुजनानंतर प्रमुख पाहुणे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. व कार्यक्रमाला कापसे सर यांनी सुरूवात केली या तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात व्यक्तिमत्व विकास, उद्याेजकता, शासकीय योजना अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी नेहरू युवा केंद्र चे तालुका समन्वयक, गणेश नावडे, पुरूषोत्तम बेले, विजय पाखरे, आदींसह प्रतिक भोसले, बालाजी गुंजकर हे प्रयत्न करत आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध