Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२०
तुच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार... श्री अर्जुनभोई मुंबई
उत्तर महाराष्ट्रात सामाजिक कार्यासाठी असतांना एका ध्येय्यवेड्या समाजबांधवास भेटण्याचा प्रसंग आला आणि राज्यातील माझ्या समाजातील तरुण बांधवांना भगिनींना आवाहन करण्याचा मोह होत आहे की, तुच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार...जळगांव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे श्री धनराज यादव भोई या ध्येय्यवेड्या तरुणाला भेटण्याचा योग आला. श्री धनराजभोई हे वरखेडी गावात श्री गणेश ड्रेसेसचे दुकान चालवतात. दुकानात लहान मुलांपासून मोठ्यांच्या कपड्यांचे दालन आहे.
अहमदाबाद मुंबई इंदोर येथून नामांकित कंपन्यांचे परिधानांचे कापड साहित्य ते आपल्या दुकानात एका काँलवर ठेवण्याची क्षमता ठेवतात. त्यांचे भाऊ हे सुध्दा त्यांना याकामी मदतीला धावून आले आहे. गावात भोई कुणबी पाटील माळी सुतार चौधरी मारवाडी या मतदारात त्यांनी आपले मोठे वलय निर्माण केले आहे. राजकिय पटलावर ही गावात सौ सुरेखा रमेश भोई ह्या माजी सरपंच होऊन गेल्या तसेच श्री यादव भगवान भोई हे डेप्युटी सरपंच होऊन गेले आहेत.
ग्रामपंचायतला गावातुन दोन तीन भोई सदस्य असतात असे ही त्यांनी सांगितले. वरील लेखनाच्या शेवटी नमुद करतो की, आपल्या समाजातील तरुण बंधु आणि भगिनींनी वर्तमान काळात नोकरीची समस्या समस्या न करता त्यांनी कोणत्याही व्यवसायात आपला जम बसवावा आणि आपली कौटुंबिक जीवन सुखकर करावे.कारण सिंह अगर चट्टान पर बैठ जाए तो वह चट्टान भी सिंहासन कहलाती है। इसलिए सिंहासन पाना नहीं बल्कि सिंह बनने का प्रयास करें ताकि आप जहां भी बैठे हो वहां सिंहासन खुद बन जाए।
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- दिंडोरी ( वणी ) : मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्याने प्राचीन तिळेश्वर महादेव मंदिर परिसर जलमय झाला. मंदिरात पुराचे प...
-
चिमठाणे प्रतिनिधी – प्रविण भोई धुळे–नंदुरबार महामार्गावरील चिमठाणे गाव शिवारातील दराणे फाट्याजवळ, पेट्रोलपंपाशेजारी सोमवारी सकाळी सुमारे ८ व...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा