Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०२०

भाजपा शिंदखेडा तालुकाध्यक्षपदी: प्रा. रमेश खैरनार तर दोंडाईचा शहराध्यक्षपदी: प्रविण महाजन




दोंडाईचा:प्रतिनिधी:भारतीय जनता पार्टी शिंदखेडा तालुकाध्यक्ष व दोंडाईचा शहराध्यक्षपदासाठी दि.10/2/2020 रोजी निवडणुक घेण्यात आली राज्याचे माजी मंत्री आ. जयकुमार रावळ यांचा मार्गदर्शनाखाली हि निवड बिनविरोध जाहिर करण्यात आली आहे.


भारतीय जनता पार्टी शिंदखेडा तालुकाध्यक्षपदी प्रा. रमेश गंगाराम खैरनार रा. पिंपळखेडा. ता. शिंदखेडा तर दोंडाईचा शहराध्यक्षपदी प्रविण हरी महाजन यांची निवड करण्यात आली.  

येथील जनदरबार रावळ गढी दोंडाईचा येथे निवडणुक घेण्यात आली होती. 

भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा अध्यक्षतेखाली हि निवड बैठक झाली. शिंदखेडा तालुकाध्यक्षपदासाठी एकूण 5 अर्ज आले होते परंतु 4 लोकांनी माघार घेतल्याने एकच उमेदवारी अर्ज शिल्लक  राहिल्याने प्रा. रमेश खैरनार यांची बिनविरोध तालुकाध्यक्ष म्हणुन निवडणुक निर्णय अधिकारी किशोर माळी यांनी निवड जाहिर केले.

तर दोंडाईचा शहराध्यक्षपदासाठी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने प्रविण महाजन  यांची शहराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी भाऊसाहेब देसले यांनी जाहिर केले.

शिंदखेडा तालुकाध्यक्षपदी रमेश खैरनार तर दोंडाईचा शहराध्यक्षपदी प्रविण महाजन यांची निवड झाल्याबद्दल माजी केंद्रीय मंत्री तथा खा. डाॅ. सुभाष भामरे, राज्याचे माजी मंत्री आ. जयकुमार रावल, भाजपा उत्तर महा. विभाग संघटन मंत्री अॅड. किशोर काळकर, भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, जि. प. उपाध्यक्षा सौ. कुसुमताई निकम, दोंडाईचा नगराध्यक्षा सौ. नयनकुवरताई रावल, शिंदखेडा नगराध्यक्ष सौ. रजनीताई वानखेडे, दोंडाईचा कृउबा समिती सभापती नारायण पाटील आदिंनी अभिनंदन केले.

या निवडप्रसंगी जिल्हा संघटन सरचिटणीस किशोर सिंघवी, जिल्हा सरचिटणीस कामराज निकम, अरुण धोबी, माजी तालुकाध्यक्ष नथ्थु पाटील, जि. प. सदस्य पंकज कदम, वीरेंद्र गिरासे, धनंजय मंगळे, संजीवनी सिसोदे, ज्ञानेश्वर भामरे, उपनगराध्यक्ष रवी उपाध्ये, बांधकाम सभापती निखिल जाधव यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध