Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १० फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
फेस गावठाण जागेत खुलेआम वृक्षतोड, वन विभागाने पंचनामा केला पण कारवाई गुलदस्त्यात
फेस गावठाण जागेत खुलेआम वृक्षतोड, वन विभागाने पंचनामा केला पण कारवाई गुलदस्त्यात
तोरखेडा:प्रतिनिधी:शहादा तालुक्यातील फेस येथे ग्रामपंचायत गावठाण जागेवरील वृक्षांची कत्तल करून विक्रीसाठी दोंडाईच्या येथे घेऊन जात असल्याची उघड झाले आहे.गावातील सरपंच तसेच वनविभागातील वरिष्ठअधिकारी व कर्मचारी यांच्या कृपा आशीर्वादाने अवैध वृक्ष तोड केले गेले असल्याच्या आरोप येथील वृक्ष प्रेमींनी केला आहे.
याबाबतचे अधिक वृत्त असे की,फेस (ता.शहादा) येथे सतरा एकरचा ग्रामपंचायत गावठाण जमिनीवरील वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात होती.तसेेेच परीसरात अनेक ठिकाणी याच प्रकारे वृक्षतोड केली गेली आहे.प्रामुख्याने उत्तम दर्जाच्या झाडांची कत्तल केली जात आहे.त्यात सिसुु,लिंब व इतर प्रकारची झाडे तोडली जात आहे.काही दिवसांपासून या भागात वृक्षतोड करणाऱ्या जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील मजुरांची टोळी सक्रिय झाली आहे.एखाद्या रोपट्याचे वृक्षात रूपांतर होण्यासाठी साधारणपणे दहा ते पंधरा वर्षे लागतात.परंतु एका दिवसात दिवसा ढवळ्या हजारो झाडाची कत्तल केली जाते.
मात्र सदर प्रकाराबाबत संबंधित ग्रामसेवकाला याची कल्पनाही नसल्याने आश्चर्य व्यक्त केेले जात आहे. एकीकडे महाराष्ट्र शासन वृक्ष लागवडसाठी लाखो रुपये खर्च करत आहेत.तर दुसरीकडे ग्रामपंचायत फेस येथे ग्रामपंचायतीच्या गावठण हद्दीत मागिल गेल्या 15 ते 20 वर्षापासून लावलेली झाडे सरपंच व ग्रामसेवकाच्या तसेच महसूल व वनविभागच्या वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांच्या संगनमताने वृक्ष तोड बिनधास्तपणे केली जात असल्याची चर्चा सध्या परिसरात जोर धरू लागली आहे. मात्र या प्रकारामुळे संबंधित विभागाने वृक्षतोड करणाऱ्यांंविरोधात कारवाई करून परीसरातील नागरिकांसमोर घडलेल्या प्रकाराची दखल घेत कारवाई करून आपल्या कर्तव्यदक्षता दाखवण्याची वेळ आत्ता संबंधित विभागांवर आली आहे.
या वृक्षतोडी संदर्भात वनविभागाने पंचनामा करून कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन अवैध वृक्षतोड करणाऱ्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यायात येईल असा ईशारा फेस ग्रामस्थांनी दिला आहे.जवळपास 15 ते 20 टन लिंब व इतर प्रकारच्या झाडांची कत्तल करून सुमारे 15 ते 20 गाड्या तोडलेले लाकूड भरून रवाना केले गेले आहे. सदर माल हा दोंडाईचा येथील एका व्यापाऱ्याने घेतलेला असून तसेच परिसरात वृक्षतोडीच्या ठेका कोण घेतो.याची ही चौकशी करून कारवाई करण्याचे आवाहन संबंधित विभागा समोर येऊन ठेपले आहे.जरी अवैद्य वृक्षतोड करणाऱ्यांविरुद्ध योग्य ती कार्यवाही न झाल्यास फेस येथील ग्रामस्थ नियोजननुसार आंदोलन करतील असे अर्जुन सोळंके,राहुल कोळी,योगेश सोळंके,हेमंत बागुल,एकनाथ चित्ते आदी ग्रामस्थांनी कळवले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा