Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२०
महाविकास आघाडी सरकारचे नाव स्थगिती सरकार करा
रावेरात भाजप जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांचा जोरदार हल्लाबोल
रावेर:प्रतिनिधी:जिल्हात फक्त दोन गावांच्या काही शेतक-यांना कर्जमाफी झाली आहे. सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक सुरु आहे. नवीन काहीही न करता मागील सरकारच्या काळातील लोकोपयोगी योजना बंद पडण्याचेच काम या सरकारकडून होत आहे. हे महाविकास आघाडी सरकार नसून स्थगिती सरकार आहे असा जोरदार हल्लाबोल जळगाव भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार हरिभाऊ जावळे यांनी केला. रावेर येथे भाजपने शेतकरी आणि महिलांच्या प्रश्नांवर आंदोलन केले. त्यावेळी ते बोलत होते.
सर्वत्र महिला असुरक्षित आहेत. मतदारांचा विस्वासघात करून निर्माण झालेले सरकार जास्त काळ टिकणार नसल्याचेही जावळे यांनी सांगितले. आंदोलनात जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना प्रल्हाद पाटील, बाजार समिती सभापती श्रीकांत महाजन, माजी जि.प.उपाध्यक्ष नंदकीशोर महाजन, जि.प.सदस्य कैलास सरोदे, नंदाताई पाटील, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, प.स.सभापती जितेंद्र पाटील, उपसभापती पी.के.महाजन, भाजपा जिल्ह्या उपाध्यक्ष पदमाकर महाजन, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष अमोल पाटील, तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, प.स.सदस्य योगिता वानखेडे, जुम्मा तडवी, कविता कोळी, शिवाजीराव पाटील, सरचिटणीस महेश चौधरी, वासुदेव नरवाडे, नगरसेविका शारदा चौधरी, शहराध्यक्ष दिलीप पाटील, उमेश महाजन, मनोज श्रावग, संजय माळी, संदीप सावळे, भास्कर बारी, सी.एस पाटील आदी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा