Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२०

शिरपूरात महाआघाडी सरकारच्या विरोधात भाजपाचे धरणे आंदोलन



शिरपूर:प्रतिनिधी:राज्यातील शिवसेना–काँग्रेस:राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडी सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक आणि महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना याचा निषेध करण्यासाठी शिरपूरात भारतीय जनता पार्टीतर्फे मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले यामध्ये भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते सहभागी होते, असे भाजपातर्फे माहिती देण्यात आली आहे.


भाजपा धुळे माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शिरपूरात तहसिलदार कार्यालय आवारात दुपारी ११ ते ४ या वेळेत धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जनतेनेही मोठ्या प्रमाणात सहभागी होवून निषेध नोंदवला.
संध्याकाळी तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.

या धरणे आंदोलनात शहराध्यक्ष हेमंत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष किशोर माळी, माजी जि. प. उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, जिल्हा चिटणीस चंद्रकांत पाटील, जिल्हा कोषाध्यक्ष आबा धाकड, पं. स. सभापती सत्तारसिंग पावरा, कृउबा समिती सभापती नंरेंद्रसिंग गिरासे, एन. डी. पाटील, महेंद्र पाटील, रोहित शेटे, मुबीन शेख, नरेश पवार, सुनिल माळी, विक्की चौधरी, डाॅ. मनोज महाजन, हेमराज राजपुत, श्याम ईशी, हिरा वाकडे, प्रशांत चौधरी, मुन्ना राजपुत, देवेंद्र देशमुख, सुरेंद्र राजपुत विजय सुर्यवंशी, मुकेश पाटील, दिपक ठाकूर, भटु माळी, रविंद्र सोनार, अविनाश शिंपी, राधेश्याम भोई, रविंद्र भोई, जयवंत पाडवी, राजुलाल मारवाडी, विपुल विचवे, महेश कोळी, जगन पाटील, सुभाष राजपुत यांचासह लोकप्रतिधी, विविध संस्थाचे पदाधिकारी, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होवुन निषेध व्यक्त केला.

भाजपातर्फे जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात, महाआघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन पाळले नाही, वचन दिल्याप्रमाणे अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपये मदत दिली नाही आणि फसवी कर्जमाफी जाहीर करून दिशाभूल केली. या राज्य सरकारने शेतकऱ्यांसह समाजाच्या प्रत्येक घटकाची फसवणूक केली आहे. या सरकारच्या काळात गुन्हेगारांना धाक न उरल्याने महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. याच्या विरोधात शिरपूरात आज धरणे आंदोलनाद्वारे जनजागृती करण्यात आली आहे असे नमुद करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध