Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
चोपडा शहरात दिल्ली येथील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केला जल्लोष,
चोपडा शहरात दिल्ली येथील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केला जल्लोष,
चोपडा: प्रतिनिधी:दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल म्हणजे लोकशाही मूल्यांचा खऱ्या अर्थाने विकासात्मक विजय होय. ह्या विजयाने आमच्या सारख्या असंख्य कार्यकर्त्यांना प्रचंड अशी ऊर्जा मिळाली आहे. व आप ला नवसंजीवनी प्रदान झाली आहे. ह्या विजयाची प्रेरणा आम्हास सदैव स्मरणीय असेल.
जाती धर्मा पलीकडे जाऊन आता मतदार जनता ही विकासात्मक बाबींवरच मतदान करणार हे यावरून स्पष्ट झाले आहे. दिल्लीतील जनतेचा व केजरीवाल टीम यांचे अभिनंदन केले, यावेळी ढोलताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना माल्यार्पण करून जनतेला साखरने तोंड गोड करून जल्लोष साजरा केला. यावेळी उपस्थित रईस खान ,आप युवा जिल्हाध्यक्ष, विठ्ठलराव साळुंखे ,तालुकाध्यक्ष, राजमल पाटील ,तालुका सचिव, विवेक गुर्जर ,मीडिया प्रवक्ता, नईम शेख, शेहबाज खान, जियाओद्दीन काझी, कम्युनिस्ट पक्षाचे अमृत महाजन , हाजी उस्मान, सागर पाटील, अबुलेस शेख, दिनेश पवार, निलेश पाटील व इतर कार्यकर्ते उपस्थित होते,
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा