Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२०
स्वाभिमानी युवा आघाडिच्या बुलडाणा जिल्हाध्यक्षपदि अंनता मानकर यांची नियुक्ती.
संग्रामपुर:प्रतिनिधी (ता.प्र.) ८ फेब्रुवारी रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा माजी खासदार राजु शेट्टी, मा.रवीकांत तुपकर व प्रशांत डिक्कर यांच्या प्रमुख उपस्थित संघटनेचे पदाधिकारी व कार्यक्रत्यांची बुलडाणा येथे जिल्हा बैठक पार पडली.दरम्यान राजु शेट्टी यांनी संघटनात्मक बांधणी साठी कार्यकर्त्याकडुन केलेल्या कामाचा आढावा घेत. नव्याने प्रमुख नियुक्त्या करण्यात आल्या. या मधे संघटनेत सक्रिय काम व माळी समाजाचे उच्च पद भुषवलेले तसेच समाजीक कार्यात प्रामाणीक काम करत असलेले अंनता मानकर यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडि बुलडाणा जिल्हाध्यक्ष पदि निवड करण्यात आली आहे.माझेवर टाकलेला विश्वास दिलेल पद याचा प्रामाणीकतेने शेतकरी शेतमजुर जणसामान्य माणसासाठी पुरेपुर उपयोग करुन न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न करेल व अधिक संघटना बांधणी बळकट करणार असल्याचे मानकर यांनी या वेळी विश्वास दिला. अंनता मानकर यांच्या निवडिने संघटनेमधे आंनदाचे वातावरण आले असुन अंनता मानकर यांचेवर सर्वच स्थरावरुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- दिंडोरी ( वणी ) : मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्याने प्राचीन तिळेश्वर महादेव मंदिर परिसर जलमय झाला. मंदिरात पुराचे प...
-
चिमठाणे प्रतिनिधी – प्रविण भोई धुळे–नंदुरबार महामार्गावरील चिमठाणे गाव शिवारातील दराणे फाट्याजवळ, पेट्रोलपंपाशेजारी सोमवारी सकाळी सुमारे ८ व...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा