Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
धुळे जिल्हा परीषदेतील कनिष्ठ शिक्षण विभागातील, लेखाधिकारी, यांना ७,००/- रू. लाचेची रक्कम स्विकारल्यानंतर. एसीबी ने पकडले रंगेहात
धुळे जिल्हा परीषदेतील कनिष्ठ शिक्षण विभागातील, लेखाधिकारी, यांना ७,००/- रू. लाचेची रक्कम स्विकारल्यानंतर. एसीबी ने पकडले रंगेहात
धुळे:प्रतिनिधी:तक्रारदार यांचे वडील हे नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या वडीलांचे ७ वा वेतन आयोगाचे फरकाची रक्कम मिळवण्या करिता गट विकास अधिकारी, पंचायत समिती, शिरपूर यांनी जिल्हा परिषद कार्यालय, धुळे येथील शिक्षण विभागात प्रस्ताव पाठविला असता. तेथील क्लार्क श्रीमती संगिता शिंपी, यांनी तकारदार यांच्या वडीलांचा ७ वा वेतन आयोगाचा फरक ४९,९३४/- रू. मंजुरीकरिता प्राप्त झाल्याचे संगणकावर दाखवुन, सदरचा प्रस्ताव मंजुरीसाठी कोषागार विभागास पाठविण्यासाठी फरकाचे रकमेतील ९३४/- रू. लाचेची मागणी करीत असल्याने तक्रारदार यांनी आज रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,धुळे येथे तक्रार दिली होती.
सदर तक्रारींच्या अनुषंगाने आज रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान महिला श्रीमती संगिता शिंपी यांनी तक्रारदार यांचे कडेस तडजोडी अंती ७००/रुपये लाचेची मागणी करुन आज रोजी जि.प. धुळे कार्यालयाच्या बाहेर दुचाकी पार्किंग जवळ पंच साक्षीदार समक्ष स्विकारले नंतर त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून, धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
सदर लाचेची मागणी संदर्भाची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री.सुनिल कडासने, नाशिक परिक्षेत्र, नाशिक, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सुनिल कुराडे, पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक श्री.मनजितसिंग चव्हाण व पोलीस निरीक्षक श्री. प्रकाश झोडगे आणि त्यांच्या पथकातील पोहेकॉ/जयंत साळवे, संतोष हिरे, सुधीर सोनवणे, संदीप सरग, कृष्णकांत वाडीले, कैलास जोहरे, शरद काटके, प्रशांत चौधरी, भुषण खलाणेकर, संदीप कदम, प्रकाश सोनार, भुषण शेटे,व सुधीर मोरे अशांनी सदरची कारवाई
केलेली आहे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा