Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ५ फेब्रुवारी, २०२०

थाळनेर येथील तरुणाचा धावत असताना पडल्यामुळे मृत्यू




थाळनेर:प्रतिनिधी:शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील 17 वर्षीय तरुणाचा व्यायाम करत असताना धरमखोई नाल्यात धावतांना दम लागून पडल्यामुळे जागेवरच मृत्यू झाला.

याबाबत थोडक्यात वृत्त असे की शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील राजे डी.एस. जमादार जूनियर कॉलेज चा अकरावी सायन्स चा विद्यार्थी कपिल सोमनाथ पाटील( ठाकरे) वय 17 वर्ष रा. ब्राह्मण पुरा थाळनेर हा आज ४/२/२०२० रोजी सायंकाळी सहा ते सात वाजेच्या दरम्यान मित्रांसोबत नेहमीप्रमाणे व्यायाम करण्यास गेला होता. 

धरम खोई नाल्यात मित्रांसोबत नेहमीप्रमाणे धावत असतांना त्यास दम लागला. यावेळी त्याच्या मित्राने त्याला थांबण्यास सांगितले.  तो रस्त्यावर पडला व बेशुद्ध झाला . 

मित्रांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला परंतु तो उठलाच नाही. मित्रांनी त्याला  लगेच गावातील डॉक्टरांकडे नेले. त्यावेळी डॉक्टरांनी तपासून त्याला शिरपूरला  नेण्यास सांगितले. त्यास बेशुद्धावस्थेत तात्काळ शिरपूरला नेण्यात आले. शिरपूरला डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. मयत कपिल हा गावातील सोमनाथ भालेराव ठाकरे यांच्या दोन नंबरचा चिरंजीव आहे. त्याचे आई-वडील व एक मोठा भाऊ , आजी, काका, काकू व भाऊ असा परिवार आहे. 

तो शाळेत हुशार विद्यार्थी मनमिळावू स्वभावाचा होता. त्यांच्या अचानक निधनामुळे थाळनेर गाव शोककळा पसरली आहे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध