Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ५ फेब्रुवारी, २०२०
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना पनवेल.
प्रतिनिधी:अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबर 2019 पासूनचे थकीत मानधन व मानधनवाढीची थकबाकी तातडीने अदा करावी. यासह अन्य प्रलंबित मागण्याबाबत दि. 03 जानेवारी 2020 रोजी महिला व बालविकास विभागाच्या सचिव श्रीमती. आय. ए. कुंदन यांची त्यांच्या दालनात आपल्या संघटनेच्या अध्यक्षा मायाताई परमेश्वर, कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील, युवराज बैसाणे आणि सुधीर परमेश्वर यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. त्यावर...
नोव्हेंबर पासूनचे थकीत मानधन व मानधनवाढीची थकबाकीची रक्कम देण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.
मिनी अंगणवाडी सेविका यांना सेविकेच्या रिक्त जागेवर प्राधान्याने थेट नियुक्ती देण्याबाबत तसेच नियमित अंगणवाडी केंद्रात रूपांतर करण्याबाबत विचार करून निर्णय घेण्यात येईल.
आहार शिजविण्याचा कंत्राट घेणाऱ्या बचत गटाची अनामत रक्कम 25 हजारांवरून 10 हजार रुपये करण्यात आली असल्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांपैकी पन्नास टक्के जागा तात्काळ भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे तसेच उर्वरित पन्नास टक्के रिक्त जागा भरण्यासाठी शासन प्रयत्नशिल आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या तिसऱ्या अपत्याबाबत कायदेशीर बाबी तपासून योग्य तो निर्णय घेतला जाईल.
मोबाईल दुरुस्तीचा खर्च व मोबाईल रिचार्जची रक्कम वाढवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
नागरी विभागातील अंगणवाडी केंद्रांचे घरभाडे दरमहा 750 वरून एक हजार ते चार हजार करण्यात आले असून लवकरच अदा करण्यात येईल. याबाबतची माहीती मिळाली.
संघटनेने केलेल्या सततच्या पाठपुराव्याने वरीलप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागले असून उर्वरित मागण्या व प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी संघटना प्रयत्नशील आहे.
म्हणून राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनिस व मिनी अंगणवाडी सेविका यांनी आपल्या न्याय व हक्कासाठी अतिशय चिवटपणे लढणाऱ्या व सतत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करणाऱ्या संघटनेचे हात आणखीनच मजबूत करावे. असे आवाहन संघटनेच्या वतीने आम्ही करीत आहोत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...
-
नाशिक प्रतिनिधी : शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला धुळे येथील प्रशांत वाडिले या...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा