Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १६ फेब्रुवारी, २०२०

लासुर येथील छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स मधील गेल्या काही दिवसापासून बंदच


 
   
सत्रासेन प्रतिनिधी:सत्रासेन ता चोपडा: लासुर येथील छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स मधील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम गेल्या पंचवीस ते तीस दिवसापासून बंद आहे.

नादुरुस्त झालेल्या एटीएम मशीन मुळे लासूर परिसरातील एटीएम ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. बँक सुट्टीच्या कालावधीत नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे व लासूर परिसरात जवळपास एटीएम नसल्यामुळे ग्राहकांमध्ये तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.

नागरिकांन कडून सांगण्यात येत आहे की एटीएमची सुरक्षा  वाऱ्यावरच असल्यामुळे पंचवीस ते तीस दिवसा पूर्वी  एटीएम मशीन चोरट्यांनी फोडण्याच्या प्रयत्न केला होता. त्यामुळे बंद झाले होत परंतु आता नागरिकांकडून सांगण्यात येत आहे की पेटीएम मध्ये सुरक्षा व्हावी व व्यवहारातील पावत्या टाकण्यासाठी डबे ठेवावे एटीएम मशीन लवकरात लवकर चालू करावे अशी मागणी परिसरातील लोकांनी केली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध