Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १६ फेब्रुवारी, २०२०

शिरपूर सांगवी गावाजवळ लक्झरी बस चालकचा नियंत्रण सुटल्यामुळे सरळ उभा असलेल्या कंटेनवर जावून आदळला!





अपघातग्रस्त झालेली लक्झरी बस

शिरपूर प्रतिनिधी : इंदौर येथील एकाच कॉलनीतील भाविक शिर्डी येथे दर्शनासाठी येत असतांना मुंबई – आग्रा महामार्गावरील सांगवी गावाजवळ उभ्या असलेल्या कंटेनवर लक्झरी बस जावून आदळल्याने गाडीतील ५५ प्रवाशी जखमी झाल्याची घटना घडली . १५ रोजी दुपारी ३ . ३० वाजेच्या सुमारास महामार्गावरील सांगवी गावाजवळील नमो पेट्रोल पंपासमोर हा अपघात झाला . 

इंदौर येथील अन्नपूर्णा मंदिर परिसरातील ५० – ५५ भाविक शिर्डी येथे दर्शनासाठी मयूर ट्रॅव्हल्स कंपनीची लक्झरी बस क्रमांक एम . पी . ०९ – एफए – ९९७९ हिच्यात निघालेत . सांगवी गावाजवळ रस्त्याच्या बाजूला कंटनेर क्रमांक एम . पी . ३३ एच – १३२६ हा उभा होता . त्यावेळी लक्झरी बस चालक अपसर खॉन अमर खॉन रा . देवास याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे सरळ उभा असलेल्या कंटेनवर जावून आदळला . त्यात इंदौर येथील सर्व राहणार हे प्रवाशी जखमी झालेत . बहुतांशी प्रवाशांचे हात – पाय फक्चर आहेत . त्यापैकी १३ जखमींना अधिक उपचारासाठी धुळे पाठविण्यात आले . घटनेचे वृत्त सांगवी पोलिस ठाण्याचे सपोनि अभिषेक पाटील यांना कळताच त्यांनी धाव घेतली . जखमींना इतरत्र हलविण्यासाठी पत्रकारांसह सिंधी समाजातील बांधवांनी सहकार्य केले .मिळालेल्या माहितीनुसार हे जवळपास सगळे प्रवाशी हे सिंधी समाजातील होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध