Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १६ फेब्रुवारी, २०२०
वन्यप्राण्यांचे तहान भागवण्यासाठी वन विभागाने व गावकऱ्यांनी उपाययोजना गरज आहे
सत्रासेन प्रतिनिधी:वन्यप्राण्यांच्या तहानेसाठी गावकऱ्यांनी व वन विभागाने मदतीसाठी पुढाकार घ्यावा तसेच वन विभागाने यासाठी काहीतरी उपाय योजना कराव्यात. असे आव्हान सत्रासेन तालुका चोपडा येथील सुभाष पाटील हरितसेना सदस्य यांनी केले आहे.
औद्योगीकरण,वाढती लोकसंख्या, बेसुमार वृक्षतोड यामुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे कित्येक प्राण्यांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. यावर्षी जिल्ह्यामध्ये पर्जन्यमान चांगला झाल्यामुळे पाणी आज पावतो पुरले परंतु यापुढे जंगलात प्राण्यांना पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होईल. उन्हाळ्याचे उन्हात मात्र पशुपक्षी तसेच प्राण्यांना पाणी मात्र मिळणार नाही तसेच जंगलातील सर्व पाण्याचे स्रोत मात्र आटतील व वन्य प्राणी पाण्यासाठी भटकंती करतील माणूस तरी आपल्या बुद्धीच्या जोरावर स्वतःसाठी पाण्याची व्यवस्था करू शकतो. पण अशावेळी मुक्या जिवांचे चे वन्यप्राण्यांचे काय ? अशा प्रश्न मनात निर्माण होत आहे.
त्यासाठी वन विभागाने तसेच गावातील नागरिकांनी तसेच हरित सेना सदस्यांनी या गोष्टीकडे बारकाईने लक्ष देऊन वन्यप्राण्यांसाठी जंगलातील पाणी संपण्याआधी व्यवस्था करायला हवी अशी माझी विनंती आहे. माझ्यासाठी नव्हे तर वन्यप्राण्यांसाठी सांगत आहेत. पाण्याच्या शोधात भटकंती करणारे प्राणी रस्ता ओलांडताना अपघात होऊन आजपाहतो बरेच प्राण्यांनी आपला जीव मात्र गमावला आहे पाण्याच्या शोधात प्राण्यांना आपला जीव गमवावा लागणार नाही यासाठी आपण पाणवठे बनवण्याचे व पाण्याची व्यवस्था करण्याचे काम मात्र करणे गरजेचे आहे त्यासाठी वनविभागाने व गावकरी मिळून आपण एक काम मात्र करायला हवे.
सुभाष पाटील (हरितसेना सदस्य सञासेन)
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा