Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ५ फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
धुळे महापालिके चे आयुक्त अजीज शेख यांनी कोरोना व्हायरस प्रसार होऊ नये यासाठी घेतली वैद्यकीय अधिकारी यांची बैठक
धुळे महापालिके चे आयुक्त अजीज शेख यांनी कोरोना व्हायरस प्रसार होऊ नये यासाठी घेतली वैद्यकीय अधिकारी यांची बैठक
धुळे:प्रतीनिधी: धुळे शहरात केरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये यासाठी धुळे महापालिके चे आयुक्त ईजाज शाहा यांनी आज दिनांक ०५/०२/२०२० रोजी दुपारी १२.०० वाजता सर्व वैद्यकीय अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
सदर बैठकीत धुळे महानगरपालिका अंतर्गत सर्व दवाखान्याच्या वैद्यकीय अधिकारी यांच्याशी कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव आपल्या शहरात होण्याची शक्यता जरी कमी असली तरी या अनुषंगाने धुळे मनपा कार्यक्षेत्रात सावधानता बाळगण्याच्या दुष्टीकोनातून चर्चा केली.
व सदर बैठकीत मा.आयुक्तानी खालील उपाय योजना करण्यासाठी निर्देश दिले आहे यात
१) आजाराची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय योजना बाबत जनजागृती होडींग लावणे, बॅनर छापणे व T.V. वर स्क्रोल देणे, ऑडीओ क्लिप वाजविणे.
२) मनपा दवाखान्यात येणाऱ्या सर्दी खोकला किंवा संशयित रुग्णाची काळजी पूर्वक तपासणी करावी व आवश्यकता वाटल्यास पुढील तपासणीसाठी वैद्यकीय महाविद्यालयात पाठवावे.
३) आपआपल्या दवाखान्यातील आरोग्य कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी यांनी वैयक्तिक संरक्षणाची साधने उदा. मास्क, हॅन्डग्लोज वापरावे. हात धुण्याची साधने उपलब्ध करून घ्यावीत किंवा सॅनीटायझर वापरावे.
४) सर्व खाजगी व्यावसायिकांच्या संस्था IMA / NIMA / होमिओपॅथि / युनानी वैद्यकीय व्यावसायिक यांच्या संघटनांना कोरोना विषाणूच्या आजरा बाबतचे मार्गदर्शक तत्वे अवगत करण्यासाठी उद्या तातडीने बैठक आयोजित करावी व त्यांच्या कडील संशयित रुग्णाचे अहवाल संकलना करीता कार्यप्रणाली निश्चित करावी.
सदर आजाराबाबत नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नसले तरी वैयक्तिक काळजी घेणे गरजेचे आहे
उदा. १) हातांची नियमित स्वच्छता २) फळे भाज्या न धुता खाऊ नये ३)
खोकलतांना व शिंकतांना रुमाल धरावा ४) तीव्र ताप व सर्दी खोकला व घसा दुखी असल्यास दवाखान्यात जावे. या
सदर बैठकीत मा.आयुक्त, अजीज शेख ,उपायुक्त, गणेश गिरी, सहा.आयुक्त,
शशांताराम गोसावी, आरोग्याधिकारी महेश मोरे व सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्ह्यात असलेल्या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर गावाजवळील औद्योगिक प्रकल्पामुळे कथितरीत्या गंभीर पर्यावरणीय प्रदूषण होत ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा