Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२०
श्री संत गजानन महाराज प्रगटदिन उत्साह प्रारंभ
विविध धार्मिक कार्यक्रम सुरुवात,
भजनी दिंडयांचे आगमन,
महारूद्रस्वाहाकार यागासे प्रारंभ
प्रतिनिधी:शेगांव:श्री संत गजानन महाराज संस्थान मध्ये दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा श्रींचा प्रगट दिन उत्सव आज दि.१०फेब्रुवारी २०२० सोमवार रोजी सकाळी ११ वाजता श्री महारूद्रस्वाहाकार यागाच्या पुजन करुन या श्रीच्या प्रगटदिन उत्साहाला सुरुवात झाली भाविकभक्तांनी श्रीच्या दर्शन गदी केली आहे
श्री संत गजानन महाराज मदिरात सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहे सकाळी ५ ते ६ काकडा ,७.१५ ते ९ .१५ भजन ,दुपारी ४ ते ५ प्रवचन ,सायंकाळी ५ ते५:३० हरिपाठ रात्री किर्तन होणार आहे दि.१० फेब्रुवारी ह भ प विनायकबुवा सातव , फुली दि ११ फेब्रुवारी ह भ प नंदकिशोरबुवा कोल्हे , सिरसोली. दि १२ फेब्रुवारी ह भ प शरद बुवा गोरले श्रीक्षेत्र पंढरपूर, दि.१३ फेब्रुवारी ह भ प संजय बोर लहाने ,करंजी दि.१४ फेब्रुवारी ह भ प भागवत बुवा कदम मुक्ताईनगर, दि.१५ फेब्रुवारी ह भ प श्रीराम बुवा ठाकूर.परभणी यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे तर दि १५ फेब्रुवारी २०२० रोजी श्री संत गजानन महाराज प्रगटदिन असल्याने या दिवशी सकाळी १० ते १२ ह भ प श्रीरामबुवा ठाकूर परभणी याचे शेगावी श्रीच्या प्रागठ्या यानिमित्त किर्तन होईल
आज दि.१० फेब्रुवारी वार सोमवार रोजी श्री महारूद्रस्वाहाकार यागाचे पुजन संस्थानचे विश्वासत विशवेशर त्रिकाळ यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील वेदमूर्ती पोपटशात्री यांच्या मार्गदर्शनाखाली यागाचे पुजन झाले आज श्रीच्या मदिरात सर्व परिसरात केळीच्या खाबाचे खुट व आंबाच्या पानाचे तोरणे लावली आहे तर दि.१५ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी १० या श्री महारूद्रस्वाहाकार यागाची पुर्णाहूती होईल दुपारी २ वाजता श्री ची पालखी अशव, गज, रथ, मेणासह नगर परिक्रमा करीता निघेल दि.१६ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ७ ते ८ काल्याचे किर्तन ह भ प प्रमोदबुवा राहणे पळशी यांच्या होईल व या प्रगटदिन उत्सावाची सांगता होणार आहे श्री प्रगटदिन उत्सावात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र, मध्येप्रदेश,या ठिकाणाहून भजनीदिडया दाखल होत आहे
गजानन अवलीया अवतरले जग तराया, ज्ञानेबुवा तुकाराम नामघोष करित शेगांव शहरात भजनी दिडया दाखल झाल्या आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...
-
संदीप अवधूत :- नाशिक ग्रामीण जिल्हयातील अवैध व्यवसायांचे समुळ उच्चाटन तसेच अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक नाशिक ग्...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा