Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२०

जाणीव झाली समाज हक्काची, आता बदल घडवू या, एक हाक देऊ एकतेची चला समाजकार्य करू या !....श्री अर्जुनभोई, मुंबई



सप्रेम जय भोई तत्समराज, औरंगाबाद येथे औरंगाबाद जिल्हा कार्यकारणीच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील भोईसमाज व त्याच्या तत्सम जमातीतील सामाजिक संघटना ह्या मौलाना आझाद संशोधन केंद्र औरंगाबाद येथे१६ फेब्रुवारी २०२० वार रविवार रोजी एकञ येण्यास सहमत झाल्या आहेत. 

आपल्या समाजात शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून सुसंस्कारित व ध्येयप्रवण पिढी उभारणे, ग्रामीण शहरी विभागातील समाज विकासासाठी विकासाचे कार्य सुसंगत करण्यासाठी आपल्या विचारातून एक ध्येयमॉडेल तयार करायचे आहे. त्यातुन रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी सुयोग्य कृतीयुक्त विचाराचा प्रचार प्रसार करणे हा आपला मुख्य उद्देश आहे. 

प्रत्येक जिल्ह्यातील विविध समस्यांचा अभ्यास, त्यावर उपाय योजनांकरिता करावा लागणारा प्रवास, मच्छीमारांच्या समस्या, मच्छीमारीसाठी विविध प्रकल्प संकलित करण्यासाठी तसेच नवीन प्रकल्प संचलित करण्यासाठी राज्यातील धन-दात्यांना एकञ करुन प्रकल्प प्रस्ताव, प्रकल्पांचे व्यवस्थापन करुन समाजातील तरुणांना काम कसे दिले जाईल यावर ही विचार विवेचन करण्यात येईल. दानशूर लोकांच्या सहभागातूनच समाज समस्याचा हा जगन्नाथाचा रथ बेरोजगार तरुणांच्या हाती देऊन निपचित पडलेल्या आपल्या भोई तत्सम जमातीच्या शाश्वत विकासाची गंगा आपल्या गावागावात आणून समाजाला स्वयंपूर्ण कसे बनवायचे आहे? यावर आपण आपले कृती युक्त अमूल्य असे विचाराचे योगदान देऊन आपला सहभाग औरंगाबाद येथे होणाऱ्या सामाजिक एकरुपता परिषदेत द्यावा असे नम्र आवाहन आम्ही करीत आहोत. प्रत्येकाने यथाशक्ती प्रमाणे समाजासाठी आर्थिक, सामाजिक, राजकिय, शैक्षणिक, सहकारीता यासाठी आपल्याला सहयोग सहकार्य द्यायचे आहे.  राज्यातील समस्त समविचारी समाज जणांची हजेरी औरंगाबाद शहरी असेल अशी अपेक्षा व्यक्त करु या. जाणीव झाली समाज हक्काची, आता बदल घडवू या ! एकतेची हाक देऊ, चला समाज विकास करू या !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध