Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
बैठकपुर्वी पर्यंत प्रसिद्धीस जोरधरण्या एकता परीषदेच्या बैठकिला, बैठक झाल्यानंतरच्या प्रसिद्धीस पुर्णविराम का???
बैठकपुर्वी पर्यंत प्रसिद्धीस जोरधरण्या एकता परीषदेच्या बैठकिला, बैठक झाल्यानंतरच्या प्रसिद्धीस पुर्णविराम का???
असो युवकांना एकीचा सूर गवसला
महाराष्ट्रातील सर्व भोईसमाज बांधवांनासाठी आनंदाची बातमी म्हणजे काल संभाजीनगर येथे पार पडलेल्या राज्यव्यापी भोईसमाज एकता परिषद बैठकीत महाराष्ट्रातुन विविध संघटना,संस्था, दल चे पदाधिकारी उपस्थित झाले होते, अनेक गोष्टींवर चर्चा झाली श्री बावणे साहेंबांनी परीषदेचे कार्य पद्धती व तिचे कार्य कश्या प्रकारे असावे या बद्दल माहिती दिली, श्री लोणारे साहेबांनी ह्या गोष्टीला मुजोरा देत अनेक प्रश्नांचे उत्तरे देऊन उपस्थितांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला, तसेच सर्वानुमते ह्या परीषदेचे नेतृत्व श्री गजानन साटोटे व संयोजक म्हणुन श्री गणेश सपकाळ, श्री ज्ञानेश्वर खैरमोडे, श्री महारु शिवदे, श्री परीसे व श्री तुषार साटोटे यांना करु देण्याचे एक मत झाले या परीषदेचे कार्यकाल १ वर्षाचा ठरविण्यात आला असुन सर्वांना एकत्र करण्यासाठी दरवर्षी प्रत्येकाला संधी देण्याचा निर्णय झाला,
सदर बैठकीत युवकांनी काहि मुद्द्यांना विरोध केला व यामुळे काहि जेष्ठ मंडळी दुखावली गेल्याचे त्यांच्या वागण्यावरुण लक्षात आले या परीषदे मार्फत अंतकर्णातुन कोणकोणत्या संघटनांचे एकत्रिकरण मनोमिलन झाले हे तर नाहि सांगता येणार परंतु आम्ही सर्व युवकांना एकतेचा सूर नक्कीच गवसलाय हेहि तेवढेच खरे म्हणावे लागेल.
भोईसमाज राज्यव्यापी एकता परीषदेत घेतले काहि ठळक मुद्दे
१. महाराष्ट्रातील सर्व संस्था, दले व संघटना आपआपल्या चालु असलेल्या कार्यास नेहमी प्रमाणे सुरू ठेवतील.
२. महाराष्ट्रात भोईसमाजावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, शासनदरबारी हक्काची मागणी करण्यासाठी, मोर्चे, आंदोलणे करण्यासाठी महाराष्ट्रातील कुठल्याहि संघटनेच्या नावाखाली न करता फक्त आणि फक्त "भोईसमाज एकता परिषद" या नावाखालीच देण्याचा निर्णय घेण्यात आला जेणे करुण शासन दरबारी आपल्या एकतेचा सुर जाईल व त्याची अंमलबजावणी करणे आपणा सर्वांची प्राथमिक जबाबदारी आहे असे मला वाटते.
३.परिषदेची कार्यप्रणाली प्राथमिक स्वरुपात तयार झालेली असुन त्यात सुधारणा किंवा काहि बदल करवयाचे असल्यास ते आपल्या मार्गदर्शनाने व सर्वांच्या एकमताने बदलण्याचे निर्णय घेण्यात आला आहे.
४. भोईसमाज एकता परीषदेची कार्यप्रणाली लवकरच पाठवण्यात येईल.
५. संयोजक ह्या नात्याने सांगु इच्छितोकी हि कुठल्या प्रकारची नवी संघटना नसुन फक्त शासन दरबारी एकतेचा संदेश व सर्व संघटना व समाज एकत्रित पणे काम कराव्यात यासाठी आहे.
तसेच १ अव्हाण हि करु इच्छितो की आता यापुढे नविन संघटना उभारुण समाजाचे विभाजन करण्यापेक्षा भोईसमाज एकता परीषदेत काम करुण समाजाला एका मार्गाने पुढे नेऊया.
विशेष विनंती - भोईसमाजाचे काम करणाऱ-या सर्व संघटना, युवा, महिला व जेष्ठ यांनी आज आपआपल्या संघटनेच कामकाज सांभाळुन एकत्र यावे.
एकत्र यावे युवकांनी आपल्या व आपल्या भाविपिठीसाठी
एकत्र यावे जेष्ठ व महिलांनी आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी
एकत्र यावे सर्वांनी तळागाळातील बांधवांना मुळ प्रवाहात आणण्यासाठी
सर्व संभाजीनगर भोईसमाज आयोजकांचे आभार व सुंदर नियोजना बद्दल अभिनंदन.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा