Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १६ फेब्रुवारी, २०२०
पुरोगामी पत्रकार संघाची महाराष्ट्र जळगाव कोर कमिटी जाहिर
प्रतिनिधी : दिनांक 09 फेब्रुवारी 2020 रोजीच्या पुरोगामी पत्रकार संघाची मागील संपूर्ण कार्यकारणी कमिटी बरखास्ती नंतर दिनांक 14/02/2020 रोजी, पुढ़ील सभा जळगाव येथिल हॉटेल साई पॅलेस येथिल सभागृहात संस्थापक अध्यक्ष - मा. श्री विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पड़ली या सभेमध्ये क्रेंद्रीय कार्यकारणीचे उपाध्यक्ष -मा. प्रविण परमार, सचिव : मा. डॉ. शिंदे उपस्थित होते तसेच मा. श्री. राजाराम माने (खजिनदार),मा. श्री. डॉन के के (कार्याध्यक्ष)यांच्या संमतीने पार पड़ली.
सभेची सुरवात संधाचे सचिव मा. डॉ. शिंदे यांनी पुरोगामी पत्रकार संघाची घटना व संघाचे कार्यांची संपूर्ण माहिती देऊन केली. संघाने आतापर्यंत केलेले कार्य आणि भविष्यात करण्यात येणारे कार्य यांचे विवचन केले. तसेच, पुरोगामी पत्रकार संघाची कोअर कमिटीची घोषणा करण्यात आली. त्यात महाराष्ट्र कोअर कमिटीच्या अध्यक्षपदी - विनोद सुधाकर पवार यांचे सर्वानुमते निवड करण्यात आली. तर उर्वरित कार्यकारणी खालील प्रमाणे .........
(1)अध्यक्ष श्री विनोद पवार (जळगाव)
(2)कार्याध्यक्षश्री विलास पाटील (नाशिक)
(3)उपाध्यक्ष श्री प्रकाशर चितळकर (मालेगाव)
(4)उपाध्यक्ष श्री संजय रूपनर (सोलापूर)
(5)उपाध्यक्ष प्रा. दशरथ रोडे (बीड)
(6)सचिव श्री सुभाष परदेशी(पुणे)
(7)सह सचिव श्री सतिश परदेशी (मनमाड़)
(8)उप सचिव श्री कैलास गर्दे (धुळे)
(9)खजिनदार श्री सुनिल चौधरी (जळगाव)
(10)उप खजिनदारश्री संतोष महाले (जळगाव)
(11)संघटकश्री संतोष परदेशी (पुणे)
(12)संघटक श्री छोटूलाल मोरे (धुळे)
(13)प्रवक्ताश्री कृष्णा बेडसे(धुळे)
(14)संघटक श्री साबीर बागवाण (जळगाव)
(15)निमंत्रक सौ. हेमलता सुभाष परदेशी (पुणे)
(16)प्रसिद्धी प्रमुख सौ. प्रतिमा रणजितसिंह चौहान(पनवेल)
(17)निमंत्रक श्री प्रल्हाद पाटील (रायगड)
वरील प्रमाणे कार्यकारणी करण्यात येऊन त्याच्या निवडीचे पत्र देण्यात आले त्यावेळी संस्थापक अध्यक्ष श्री विजय सूर्यवंशी यांनी अभिनंदन करुन आपआपल्या पदाची जाणीव करून दिली सभेचे शुभ संचानल मा. डॉ शिंदे यांनी केले तर विनोद पवार यांनी आभार व्यक्त केले.मा. अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपली असे जाहिर करण्यात आले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा