Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १६ फेब्रुवारी, २०२०
श्री संत गजानन महाराजांचा १४२ वा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा
या सोहळ्यासाठी ३३५ पायी दिंड्या-पालख्या शेगावात दाखल झाल्या आहेत.
शेगाव संस्थानच्या वतीने या सर्व दिंडी आणि पालख्यांसाठी विविध सुविधाही पुरवल्या जात आहेत.
राज्यभरातून हजारो भाविक या प्रगक दिन सोहळ्यासाठी शेगाव येथे महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आले आहेत.
शेगांव (प्रतिनिधी)- : विदर्भाची पंढरी म्हणून ख्याती असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव येथे दरवर्षी श्री संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केला. यावर्षीसुद्धा हजारो भाविक या सोहळ्यासाठी संतनगरी शेगाव दाखल झाले होते.
श्रीसंत गजानन महाराज हे १४२ वर्षापूर्वी संतनगरी शेगाव येथे प्रकट झाले होते. त्याठिकाणी त्यांनी आपले जीवन शेगाव वासियांच्या सहवासात घालविले. दरम्यान त्यांनी मोठा भाविक वर्ग निर्माण केला होता आणि येथेच ते समाधिस्त झाले. आज गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त सकाळी 4 वाजल्यापासूनच भाविकांनी संतनगरी शेगाव मोठी गर्दी केली होती.
या सोहळ्यासाठी ३३५ पायी दिंड्या-पालख्या शेगावात दाखल झाल्या आहेत. शेगाव संस्थानच्या वतीने या सर्व दिंडी आणि पालख्यांसाठी विविध सोई-सुविधाही पुरवल्या जात आहेत. राज्यभरातून हजारो भाविक या प्रगक दिन सोहळ्यासाठी शेगाव येथे महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आले होते.
आज शनिवारी दुपारी 2 वाजता गजानन महाराजांच्या रजत मुखवट्याची विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर रथ, गज, अश्वासह नगरपरिक्रमेला सुरुवात झाली. टाळ मृदुंगाच्या निनादात 'गण गण गणात बोते'चे नामस्मरण करत श्री गजानन महाराजांच्या रजत मुखवट्याची पालखी निघाली. पुढे पताकाधारी सेवक त्यामागे वारकरी गजानन महाराजाचे नामस्मरण करत निघाले. शेगावमध्ये येणाऱ्या लाखो भाविकांसाठी ठिकठिकाणी महाप्रसादाचे आयोजन भक्तांच्या वतीने करण्यात आले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा