Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १ फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
दहावी- बारावीच्या परीक्षेसाठी विशेष परीक्षा निरीक्षक नियुक्त करावेत : जिल्हाधिकारी गंगाथरन डी.
दहावी- बारावीच्या परीक्षेसाठी विशेष परीक्षा निरीक्षक नियुक्त करावेत : जिल्हाधिकारी गंगाथरन डी.
प्रतिनिधी:धुळे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी/मार्च 2020 मध्ये होणार आहेत. या परीक्षा गैरमार्गमुक्त, कॉपी विरहीत होण्यासाठी सर्वांचीच महत्वपूर्ण जबाबदारी असून धुळे जिल्ह्यातील अतिसंवेदनशील आणि मोठ्या प्रमाणात कॉपी होणाऱ्या केंद्रांवर शिक्षण विभागाने विशेष परीक्षा निरीक्षक नियुक्त करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष गंगाथरन डी. यांनी दिले आहेत.
जिल्हा दक्षता समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, शिक्षणाधिकारी डॉ. सुभाष बोरसे (माध्यमिक), मनीष पवार (प्राथमिक), एल. जे. खंदारे (निरंतर) आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गंगाथरन डी. म्हणाले, संवेदनशील परीक्षा केंद्रांवर पोलिस उपनिरीक्षकांची पूर्णवेळ नियुक्ती करावी.
परीक्षा सुरू होण्याच्या एक तास आधी पोलिस, गृहरक्षक दलाच्या जवानांनी परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहावे. तसेच विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांचा समावेश असलेले बैठे पथक नियुक्त करावेत. केंद्रांवर संलग्न असलेल्या शाळेतील शिक्षकांना पर्यवेक्षक नियुक्ती न देता अन्य केंद्रातील शिक्षकांची नियुक्ती करावी. या केंद्रावर संस्थांतर्गत विद्यार्थी असल्यास त्याच संस्थेचा, शाळेचा पर्यवेक्षक नियुक्त होणार नाही याचीही दक्षता घ्यावी.
भरारी पथकांनी जास्तीत जास्त केंद्रांना भेटी द्याव्यात. केंद्र संचालक, पर्यवेक्षक व परीक्षाकामी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी कुणीही हलगर्जीपणा केल्यास कठोर कारवाईस पात्र राहतील. परीक्षा कालावधीत महसूल विभागाची स्वतंत्र यंत्रणाही कार्यान्वित राहील, असेही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी सांगितले.
माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. बोरसे यांनी सांगितले, बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च 2020, तर दहावीची परीक्षा तीन ते 23 मार्च 2020 या कालावधीत होईल. बारावीसाठी 44, तर दहावीसाठी 63 परीक्षा केंद्र असतील.
याशिवाय आठ परीरक्षक केंद्र असतील. परीक्षा कालावधीत बाहेरील घटकांनी केंद्राबाहेर जमून कोणताही अनुचित प्रकार करू नये. तसेच परीक्षा निकोप वातावरणात पार पडेल याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असेही त्यांनी आवाहन केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा