Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १ फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
शिरपूर वरवाडे नगरपरिषदे मार्फत स्वच्छ सर्वेक्षण लीग २०२० स्मार्ट गृहिणी स्पर्धेचा समारोप
शिरपूर वरवाडे नगरपरिषदे मार्फत स्वच्छ सर्वेक्षण लीग २०२० स्मार्ट गृहिणी स्पर्धेचा समारोप
शिरपूर:प्रतिनिधी:केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत समाजातील सर्व घटकांचा सहभागाने “स्वच्छ सर्वेक्षण लीग २०२०” ही राष्ट्रव्यापी मोहीम राबविणे कामी आवाहन केले होते. “शिरपूर वरवाडे नगरपरिषद व श्रीजी इव्हेंट मॅनेजमेंट गृप” यांच्या संयुक्त विद्यमानाने या
अभियानांतर्गत जनजागृतीपर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
शिरपूर वरवाडे नगरपरिद नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, मुख्याधिकारी अमोल बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ सर्वेक्षण लीग २०२० हे अभियान राबविले जात आहे.
या कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून शिरपूर शहरात “स्वच्छ सर्वेक्षण २०२० स्मार्ट गृहिणी स्पर्धा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे नगरसेविका सौ.संगिता देवरे, डॉ. सुनिता बागुल होते. “स्मार्ट गृहिणी स्पर्धा” २०१९-२० ही स्पर्धा शहरात ओला व सुका कचरा विलगीकरण, प्लास्टिकबंदी, होम कम्पोस्टिंग, कापडी पिशवीचा वापर, वैयक्तिक शौचालयाचा वापर यावर जनजागृती व्हावी याकरिता राबविण्यात आली.
सदर स्पर्धेसाठी सहभागी गृहिणींसाठी काही अटी आणि शर्ती याची पूर्तता करुन स्पर्धेमध्ये दोन राऊंड घेण्यात येऊन विजेता घोषित करण्यात येत होते. महिलांच्या उत्साहाखातर स्मार्ट गृहिणी यास्पर्धेचा कालावधी १ महिना ऐवजी २ महिने असा करण्यात आला. स्मार्ट गृहिणी स्पर्धेत एकूण १०५ गृहिणी यांनी सहभाग नोंदविला. तर सदर कार्यक्रमात एकूण १५०० गृहिणी उपस्थित होत्या आणि त्या दरम्यान स्पर्धकांना स्वच्छतेवर आधारित प्रश्न विचारण्यात आले.
तसेच विजेता व उपविजेता स्मार्ट गृहिणीची घोषणा दिपाली साळुंके यांनी केली. विजेता रत्ना परदेशी यांना नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांच्या हस्ते, उपविजेता मंजू झँवर यांना डॉ. सुनिता बागुल यांच्या हस्ते बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच सर्व स्पर्धकाना नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांनी परिसरातील सर्व महिलांना आवाहन केले की, शिरपूर शहराला प्लास्टिकमुक्त, त्याचप्रमाणे स्वच्छ व सुंदर शहर बनविण्यासाठी सहकार्य करावे. ही स्पर्धा विद्याविहार कॉलोनी या परिसरातील ५ गृहिणींमध्ये घेऊन स्पर्धेचा समारोप करण्यात आला.
सदर कार्यक्रम मुख्याधिकारी अमोल बागुल, प्रशासकिय अधिकारी संजय हासवाणी, नोडल ऑफिसर सागर कुळकर्णी, स्वच्छता निरीक्षक जितेंद्र अहिरे, आरोग्य सहायक दिपाली साळुंके, आर.सी.पटेल मराठी प्रा.शाळेचे मुख्याध्यापक महेंद्रसिंग परदेशी, गणेश साळुंखे, प्रशांत चौधरी, भामरे सर, श्रीजी इव्हेंट मॅनेजमेंट गृपच्या प्रकल्प समन्वयक सुषमा पवार, प्रतिनिधी तुषार धनगर, गोपाल माळी, ज्योती चौधरी, रेखा धनगर, ज्योती पाटील, इंदिरा माळी, शहर समन्वयक भावना कलंकार, यांच्या समवेत पार पाडण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद अहिरे, सी.डी.पाटील यांनी विद्याविहार कॉलोनीतील महिलांची निवड केल्याबद्दल आभार मानले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा