Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १ फेब्रुवारी, २०२०

शेतकऱ्यांना दिवसा विद्युत पुरवठा करा- प्रहार संघटनेची मागणी


शिंदखेडा:प्रतिनिधी:शिंदखेडा व दोंडाईचा ग्रामीण तालुक्यातील शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध असून सध्या रब्बी पिकांची पेरणी करून गहू मका हरभरा दादर भुईमूग इत्यादी पिकांना सिंचनासाठी पाण्याची आवश्यकता असते मात्र विद्युत 

विभागाकडून शेतकऱ्यांना कधी दिवसा तर कधी रात्री वीज पुरवठा केला जातो मात्र  रात्रीच्या विज पुरवठ्यामुळे  शेतकऱ्यांना  रात्री पहाटे शेतात जाऊन पिकांना पाणी देण्यासाठी  काम करावे लागते  यादीत शेतकरीही दिवसभर  आपल्या शेतात मशागत करत असतो  आणि पिकांना पाणी देण्यासाठी त्याला पुन्हा रात्री शेतात काम करावे लागते  त्यामुळे अनेक वेळा शेतकऱ्यांना मानसिक त्याला सामोरे जावे लागते. 

म्हणून ज्याप्रमाणे व्यापारी संस्थांनी कार्यालय यांच्यासाठी दिवसा वीज पुरवठा दिला जातो त्याचप्रमाणे दोंडाईचा ग्रामीण शेतकऱ्यांना उच्च दाबाच्या सुरळीत वीजपुरवठा किमान दिवसाचे बारा तास का होईना पण दिवसा देण्याची व्यवस्था करावी असे निवेदन देण्यात आले. 

रात्रीच्या वीजपुरवठा मुळे शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागत असून  याबाबत आवश्यक ते बदल करून  शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा अशी विनंती करण्यात आली आहे  

आणि याबाबत विधिमंडळाने गांभीर्याने कारवाई करून  आठ दिवसाच्या आत निर्णय न घेतल्यास  प्रहार जनशक्ती पक्षाकडून  आपल्या कार्यालयात  दिनांक आठ फेब्रुवारी 2020 रोजी तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोर्चा काढून  मागणी मान्य होईपर्यंत  कार्यालयातच ठिय्या आंदोलन करण्यात येईल  असा इशारा दिला आहे 

या निवेदनावर  प्रहारचे तालुकाध्यक्ष  पंकज सिसोदिया, राहुल पाटील, परमार, गणेश गिरासे,  भटु पाटील  कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध