Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २६ फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
खान्देश एक्सप्रेस दररोज सुरू करण्याबाबत आमदार अनिल पाटील यांचे विधानसभाअध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन
खान्देश एक्सप्रेस दररोज सुरू करण्याबाबत आमदार अनिल पाटील यांचे विधानसभाअध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन
प्रतिनिधी:अमळनेर:मंगळवारी खान्देश एक्सप्रेस दररोज सुरू करण्याबाबत आमदार अनिल पाटील यांचे विधानसभाअध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले असून याबाबत गुरुवारी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी पश्चिम रेल्वेचे व मध्य रेल्वेचे संबंधित वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांची आपल्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
खान्देश एक्स्प्रेस वेळापत्रकानुसार खान्देश एक्सप्रेस ही वांद्रे टर्मिनल ते भुसावळ जंक्शन पर्यंत मंगळवार, गुरुवार व शनिवार असे तीन दिवस सुटते तसेच भुसावळ जंक्शन ते वांद्रे टर्मिनस येथूनही मंगळवार, गुरुवार व शनिवार याप्रमाणे तीन दिवस सुटते, याबाबत माझ्याकडे जळगाव, धुळे तसेच नंदुरबार जिल्हयातून अनेक प्रवाशांनी मागणी केलेली आहे.
खान्देश एक्सप्रेस ही वांद्रे टर्मिनस व भुसावळ जंक्शन येथून दररोज सुटावी जेणेकरुन सर्व सामान्य प्रवाशांना तसेच जळगाव, धुळे, नंदुरबार या तिन्ही जिल्हयामधून (खान्देशातून) आमदार व खासदार सुध्दा या रेल्वेने प्रवास करतात यासाठी खान्देश एक्सप्रेस भुसावळ जंक्शन व वांद्रे टर्मिनस येथून दररोज सुटावी. जेणेकरुन सर्वसामान्य प्रवाशांना व आमदार,खासदार यांनाही या रेल्वेने येण्या जाण्यासाठी सोय उपलब्ध होईल.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...
-
नाशिक प्रतिनिधी : शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला धुळे येथील प्रशांत वाडिले या...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा