Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२०
सरकार संवेदनशील नाही - खासदार नारायणराव राणे
आझाद मैदानात मराठा आंदोलकांच्या भेटीला मराठा आरक्षणाचे प्रणेते खासदार मा. नारायणराव राणे साहेब
सकल मराठा समाजातील उमेदवार नियुक्त्या कराव्यात या मागणीसाठी २५ दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. मात्र महाविकास आधाडी सरकारने त्यांच्या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. यावरून हे सरकार संवेदनशील नाही, असा आरोप भाजप खासदार नारायणराव राणे यांनी शुक्रवारी केला. नियुक्त्या झाल्याच पाहिजे यामागणीसाठी सकल मराठा समाजातील उमेदवार आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. नारायणराव राणे यांनी शुक्रवारी त्यांची भेट घेत लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
देवेंद्र फडणवीस असताना उमेदवारांनी भेट घेत त्यांच्यासमोर प्रश्न मांडला असता तर, त्याचवेळी प्रश्न सूटला असता. मराठा आरक्षण लागू झाले असताना आता सकल मराठा समाजातील उमेदवारांना का डावलले जात आहे. सरकार काही त्रुटी असतील तर त्या दूर करू शकते. अधिकाऱ्यांना आदेश देऊ शकते. पण या सरकारची इछाशक्ती दिसत नाही.
सोमवारी संबंधित मंत्री व अधिकारी यांची भेट घेत त्यांना याचा जाब विचारतो, असे आश्वासन यावेळी नारायणराव राणे यांनी आंदोलनकर्त्यांना दिले. आझाद मैदानात बसून काय होणार, आंदोलनाचे स्वरुप बदलले पाहिजे, तरच राज्य सरकारला जाग येईल, असेही राणे म्हणाले. मराठा आरक्षणाप्रमाणे नियुक्त्याही झाल्याच पाहिजे, त्यासाठी वाटेल ते करेन, असा विश्वास नारायण राणे यांनी आंदोलनकर्त्यांना यावेळी दिला.
राज्य सरकारच्या विविध विभागातील रिक्त पदासाठी मराठा समाजातील उमेदवारांनी लेखी परीक्षा पास केल्या, गुणवत्ता यादीत आले, तरीही ३,५०० पात्र उमेदवारांना नियुक्तीपासून डावलले जात आहे. राज्य सरकारच्या निषेधार्थ आझाद मैदानात २८ जानेवारीपासून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. तरीही राज्य सरकार सकल मराठा समाजातील उमेदवारांच्या मागणीची दखल घेत नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला. तसेच मराठा आरक्षण राणे साहेबांमुळे लागू झाले, त्याचप्रमाणे सकल मराठा समाजातील उमेदवारांच्या नियुक्त्या होतील, असा विश्वास आंदोलनकर्त्यांनी राणे साहेबांवर व्यक्त केला.
कलम १८ नुसार नियुक्त्या करणे बंधनकारक असून राज्य सरकार नियुक्त्या करण्यास चालढकल करत आहे. मंत्रालयात बैठका आयोजित केल्या जातात, पण ठोस उत्तर मिळत नाही, अशी तक्रार उमेदवारांनी यावेळी राणे यांच्याकडे केली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा