Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ५ फेब्रुवारी, २०२०
Home
/
राजकीय
/
लोकशाहीचे मुद्दे मांडत गावागावानंमध्ये शिबिर. प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे याच्या उपस्थितीत लोकशाही उत्सवाचा सांगता. लोकशाही उत्सवात तीस गावांचा सहभाग.
लोकशाहीचे मुद्दे मांडत गावागावानंमध्ये शिबिर. प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे याच्या उपस्थितीत लोकशाही उत्सवाचा सांगता. लोकशाही उत्सवात तीस गावांचा सहभाग.
शाहदा:प्रतिनिधी:कल्पेश राजपूत
लोकशाहीच्या संवर्धनासाठी उत्सव, येत्या २६ ते ३० जानेवारी दरम्यान दरवर्षी सामाजिक व शैक्षणिक संस्था,लोकशाहीचे मुद्दे मांडत गावागावानंमध्ये शिबिर संघटना, व्यक्ती तसेच लेखक,विचारवंत, ग्रामपंचायती व पत्रकार मिळून राज्यभर लोकशाही उत्सव साजरा करण्यात आला.
राज्य घटनेतील मूल्यांचे संरक्षण, संवर्धन व्हावे आणि लोकशाही अधिकाधिक समृद्ध व्हावी. हा या उत्सवा मागचा उद्देश आहे. वस्तुतः भारतात सद्या लोकशाही वर अनेक आघात होत आहेत. हे सूर्य प्रकाशाइतके स्पष्ट आहे. मात्र त्याच वेळी लोकशाहिच्या संरक्षणासाठी, बहुसंस्कृतिक्ता जपण्यासाठी स्रिया, विध्यार्थी, युवक, कलाकार, साहित्यिक असे लाखो लोक विविध प्रकारे आवाज उठवत, "हम देखेंगे..." म्हणत पाय रोवून उभे आहेत.
गेल्या ४५ वर्षातील सर्वाधिक बेरोजगारी, प्रचंड महागाई , रेल्वेचे आणि इतर सरकारी कंपन्यांचे विक्री, कर्मचारी कपात सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतल्या भांडवलदारांचे कोटकल्याण शेतकऱ्यांच्या आत्महत्या, स्त्रीयांवरील हिंसाचार असे अनेक गोष्टी आहेत. सक्षम ग्रामसभा हे लोकशाहीचे महत्त्वाचे अंग आहे .
यासाठी जातीचे व उत्पन्नाचे दाखले व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी खेडेगावात शिबिरे घेतली जातील , असे प्रतिपादन प्रांताधिकारी डॉ . चेतन गिरासे यांनी केले .
लोकशाही उत्सवाच्या समारोपासाठी विचारधारा फाउंडेशनतर्फे पाडळदा ( ता . शहादा ) येथे आदिवासी मेळावा झाला , त्यावेळी अध्यस्थानी डॉ .गिरासे , शिक्षण विस्तार अधिकारी डी . टी . वळवी , आदिवासी लेखक व विचारवंत वाहरू सोनवणे , भिमसिंग पवार , ठगीबाई वसावे आदी उपस्थित होते . मागील तीन वर्षांपासून नंदुरबार जिल्ह्यातही हा उत्सव साजरा केला जात आहे .
श्री.वळवी यांनी भारतीय संविधानातील स्वातंत्र्य,समता,बंधुता व सामाजिक न्याय या मूल्यांची मांडणी करून शिक्षण हक्क कायद्याबद्दल माहिती दिली .
आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्याबाबत लोकांना आवाहन केले . कवी वाहरू सोनवणे यांनी 'आदिवासी संस्कृतीमधील लोकशाही मूल्य ' विषयावर मांडणी केली .
प्रास्ताविक व लोकशाही उत्सवाची भूमिका विचारधारा फाऊंडेशनचे संचालक तात्याजी पवार यांनी मांडली . मंडळ अधिकारी पाटील , तलाठी प्रियंका पाटील , पोलिस पाटील राजश्री भील , शिक्षक तसेच आशा वर्कर , अंगणवाडी सेविका तसेच पाडळदा भागापूर , कवळीथ , सोनवल , टूकी , गोगापूर ,बडवी ,गोदीपूर ,भोरटेक , चिखली खुर्द, ओझर्टा व न्यू .असलोद येथील तीनशे महिला पुरुष उपस्थित होते .
मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी विलास अहिरे , रवींद्र ठाकरे , दिनेश ठाकरे , दिनेश वाघ , नारायण पवार , मेघराज भील , शरद पवार गोपाल ठाकरे , सुक्राम पवार , गणेश मुसळदे यांनी परिश्रम घेतले .
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
राजकीय
Tags
राजकीय
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा