Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२०
शेगावात धोबी परिट महासंघाच्या वतीने गाडगेबाबा जयंती साजरी
संत गाडगेबाबांचे विचार आचरणात आणा - नगराध्यक्षा सौ.बूच
मुख्य मार्गाने संत गाडगेबाबा यांची मिरवणूक
शेगाव(तालुका प्रतिनिधी) आयुष्यभर समाज प्रबोधनाचे काम करून समाज घडविण्यासाठी रस्त्यावरचे जीवन जगणाऱ्या थोर महापुरुषां मध्ये संत गाडगेबाबा यांचे मोलाचे कार्य असून त्यांनी भुकेल्याना अन्न द्या, तहानलेल्याना पाणी द्या, हरपलेल्याना आधार द्या यासह विविध मोलाचे उपदेश दिले आहेत व आजच्या युगात या विचारांची समाजाला गरज असल्याने प्रत्येकाने संत गाडगेबाबा यांचे विचार आचरणात आणून समाजासाठी सत्कर्म करावे असे आवाहन संतनगरीच्या नगराध्यक्षा सौ.शकुंतलाताई पांडुरंग बूच यांनी केले आहे.
येथील वर्धमान भवन मध्ये २३ फेब्रुवारी रोजी धोबी परीट महासंघाच्या वतीने संत गाडगेबाबा यांची राज्यस्तरीय जयंती साजरी करन्यात आली यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष शालिग्राम कंधारकर हे तर प्रमुख उपस्थिती नगराध्यक्षा सौ.शकुंतलाताई बूच, तहसीलदार श्रीमती शिल्पाताई बोबडे, राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.सुशीलदादा वणवे, सामाजिक कार्यकर्ते कमलाकर चव्हाण, सा.बा. विभागाचे अभियंता किशोरकुमार मिश्रा, खिरोडा सरपंच गजानन कडूकार, सरपंच संतोष पळसकर, सौ.रेखा बावसकर यांची होती. सकाळी शहरातील मुख्य मार्गाने संत गाडगेबाबा यांची मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर गाडगेबाबा चौकात महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले आहे.
तसेच समाजातील विविध मान्यवरांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला असून याप्रसंगी धोबी परीट महासंघाचे सर्व पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन धोबी परीट महासंघाचे संजय सुरळकर यांनी तर आभार महादेव इधोकार यांनी मानले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्ह्यात असलेल्या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर गावाजवळील औद्योगिक प्रकल्पामुळे कथितरीत्या गंभीर पर्यावरणीय प्रदूषण होत ...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा