Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२०
श्री क्षेत्र शेगाव येथे भोई गौरव मासिकाचे जिल्हा व तालुका प्रतिनिधी सभा संपन्न
प्रतिनिधी:श्री क्षेत्र शेगाव येथे दिनांक 23 फेब्रुवारी 2020 रोजी शासकीय विश्रामगृहात भोई गौरव मासिकाच्या
जिल्हा तालुका प्रतिनिधी तसेच संपादक मंडळाची संयुक्त सभा संपन्न झाली
या सभेत बहुजन वंचित आघाडीच्या तिकीटवर जिल्हा परिषदेत नुकतेच निवडून आलेले आपले समाज बांधव श्री संजय बावणे यांचा भोई गौरव मासिक व शेगाव शहराच्या वतीने मासिकाचे मुख्य संपादक चंद्रकांत लोणारे व उमेश राजगुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच तरुण गर्जना या वृत्तपत्राचे मुख्य संपादक श्री संतोष भोई शिरपूर जिल्हा धुळे यांचाही सत्कार करण्यात आला तसेच शेगाव शहर प्रतिनिधी व खामगाव प्रतिनिधी तसेच शेगाव भोई समाज बांधवांच्या वतीने भोई गौरव चे मुख्य संपादक श्री चंद्रकांत लोणारे यांचा सुद्धा सपत्नीक शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला उपस्थित सर्व प्रतिनिधींचे व संपादक मंडळातील सदस्य राजाराम म्हात्रे व सौ चित्रा मेश्रे यांचे उमेश राजगुरे व निलेश साटोटे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सत्कारानंतर या सभेत मासिकाच्या प्रगतीबाबत व नवीन प्रतिनिधी नियुक्त करणे व ज्यांना मागील वर्षी प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे
त्या प्रतिनिधींनी आपल्या भागात मासिकाची सभासद संख्या वाढवावी अशी सुचना सर्व प्रतिनिधींना देण्यात आली. मासिकाची सभासद संख्या वाढविणे, जाहिराती मिळविणे,या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या सभेत उपस्थित प्रतिनिधी व समाज बांधवांनी मासिकाच्या प्रगतीसाठी विविध उपाययोजना सुचवल्या त्या सर्व सूचनांचा आदर करून भविष्यात मासिकाच्या प्रगतीसाठी त्या सूचना निश्चित अमलात आणल्या जाईल असे मुख्य संपादकांनी सांगितले तसेच इतरही शहरात या मासिकाची सभा व्हावी अशी काही प्रतिनिधींनी इच्छा दर्शविली. परतवाडा प्रतिनिधी श्री बाळू कावनपुरे यांनी चिखलदरा येथे भोई गौरव मासिकाची अशीच सभा घेण्याची इच्छा व्यक्त केली.
त्याला उपस्थितांनी दुजोरा दिला या मिटिंगच्या आयोजनाची जबाबदारी शेगाव शहर प्रतिनिधी श्री उमेश उमेश राजगुरे व खामगाव प्रतिनिधी निलेश सटोटे यांनी उत्तम रित्या पार पाडली. या सभेचे उत्तम सुत्रसंचालन सहसंपादक राजाराम म्हात्रे अकोला यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री उमेश राजगुरे यांनी केले या सभेला सहसंपादक राजाराम म्हात्रे सौ चित्रा मेश्रे तसेच प्रतिनिधी सुनिल कुमार भामद्रे, बाळू गोविंदराव कावनपुरे, निलेश साटोटे, उमेश राजगुरे, विजय साटोटे सुनंदा गायकवाड पुणे,तसेच अकोला व बुलढाणा या भागातील प्रतिनिधी उपस्थित होते. शेगाव शहरातील विविध चॅनलचे प्रतिनिधी तसेच पत्रकार बंधु उपस्थित होते.
व शेगाव येथील संतोष राजगुरे, अविनाश नंदाने, बाबुराव घट्टे, बाबुराव राजगुरे,प्रभुदास सोनोने, गजानन घट्टे, राजेश श्रीनाथ रामरावजी बावणे ,नितीन राजगुरे, शुभम राजगुरे, भास्कराव नंदाने विशाल राजगुरे, प्रतीक सोनवणे ,आकाश धारपवार,उत्तम राव सुरेख,मनोज मिस्त्रीय ,समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी नवीन सभासद नोंदणी सुद्धा करण्यात आली मासिकाच्या उत्तरोत्तर प्रगतीला सर्व समाज बांधवांनी शुभेच्छा दिल्या व शेगावात जास्तीत जास्त सभासद संख्या वाढविण्यासाठी संकल्प केला
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा