Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२०

धुळेकर रसिकांसाठी वैचारिक पर्वणी शिवजयंतीचे औचित्य साधून शिवचरित्र व्याख्यान मालेचे धुळे महानगरपालिका मार्फत आयोजन









धुळे:प्रतिनिधी:महानगरपालिका मार्फत दिनांक २७, २८ फेब्रुवारी व एक मार्च या कालावधीत तीनदिवसीय शिवचरित्र व्याख्यान मालेचे आयोजन करण्यातआले असुन शिवजयंतीचे औचित्य साधून धुळे महानगरपालिका मार्फत धुळे महानगरातील रसिकांसाठी या वैचारिक प्रबोधनात्मक अशा शिवचरित्र व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले असून या व्याख्यान मालेची खालील प्रमाणे रुपरेषा असेल


शुक्रवार, दि. २८/२/२०२० रोजी
सायंकाळी. ७.०० वाजता
व्याख्याते -: मा. निशिगंधा वाड
(चित्रपट अभिनेत्री)
विषय-: रयतेचा, शेतकर्यांचा, महिलांचा सन्मान करणारे राजे छत्रपती


शनिवार, दि. २९/२/२०२० रोजी
सायंकाळी. ७.०० वाजता
व्याख्याते -: मा. राहुल सोलापुरकर
(शिवचरित्र व्याख्याते, अभिनेते)
विषय-:  अफजलखानाचा वध, अर्थात् 'प्रतापगडचे युद्ध'
 

रविवार, दि. ०१/३/२०२०  
सायंकाळी. ७.०० वाजता
व्याख्याते -: मा.प्रा. शरद गोरे
(इतिहास संशोधक, पुणे)
(राष्ट्रीय कार्याध्यक्ष, अ.भा. मराठी साहित्य परिषद)

विषय-:  'अजिंक्य संभाजी'

या व्याख्यान मालेचे ठिकाण - धुळे महानगरपालिकेच्या नूतन इमारतीच्या प्रांगणात सायंकाळी सात ते दहा या कालावधीत होणार असून. सदर व्याख्यानमाला ही विनामूल्य असून  धुळे शहरातील तमाम रसिक कलावंत अभ्यासू नागरिकांसाठी ही एक पर्वणी लाभणार आहे यासाठी या व्याख्यानाचा सर्वानी लाभ घ्यावा असे आवाहन. आयुक्त. अजिज शेख, महापौर. चंद्रकांत सोनार,
उपायुक्त. गणेश गिरी, महिला बालकल्याण उपसभापती
सौ. रेखा सोनवणे 
महिला बालकल्याण सभापती
सौ. स्नेहल जाधव
विरोधी पक्ष नेते. साबीर शेख 
म.न.पा.सभागृह नेते. कांतीलाल दाळवाले, स्थायी समिती सभापती.
सुनिल बैसाणे, उपमहापौर
सौ. कल्याणीताई अंपळकर व सर्वे नगरसेवक बंधु-भगिनी,अधिकारी, कर्मचारी धुळे महानगरपालिका, धुळे यांच्या वतीने आव्हान करण्यात आले असुन या व्याख्यान माले साठी 
खालील प्रमाणे बैठक व पार्किंग  व्यवस्था करण्यात आली आहे

१) व्याख्यान वेळेवर सुरु होईल. ५ मिनिटे आधी आसनस्थ व्हावे. 

२) ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था.

३) महिलांसाठी दुचाकी पार्किंग व्यवस्था मनपा नूतन इमारतीच्या ध्वजस्तंभाजवळील जागेत.
 
४) चार चाकी पार्किंग व्यवस्था जुन्या
मनपा इमारतीत. 

५ ) इतर पार्किंग व्यवस्था नूतन मनपा इमारतीच्या बाजूला. गरुड हायस्कूल समोर.
धुळे



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध