Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२०
पो.नि.हेमंत पाटील यांची शिरपूर शहर पोलीस ठाण्यात नियुक्ती
शिरपूर:प्रतिनिधी:स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांची नियंत्रण कक्षातून शिरपूर शहर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली त्यांनी आपला पदभार सांभाळला आहे.
ध ु ळ् य ा त ी ल चाळीसगाव रोड व शंभर फुटी रस्त्यावर भारत बंद दरम्यान दोन गटात दंगल झाली होती. या दंगलीचा तपास करताना संशयित आरोपींचे निष्पक्षपणे अटकसत्र सुरु असताना वरिष्ठ पातळीवरुन राजकीय हालचाली झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागेवर शिरपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांची नेमणूक करण्यात आली होती.
निरीक्षक बुधवंत यांनी शिरपूरचा पदभार सोडून गुन्हे शाखेचा पदभार स्वीकारल्यानंतर शिरपूर शहर पोलिस ठाण्याची जागा रिक्त झाली होती. तसेच या जागेवर अधिकार्यांमध्ये चुरस निर्माण झाली असताना निरीक्षक हेमंत पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे.
निरीक्षक पाटील हे काल पदभार स्वीकारला आहे. बदली झाल्याच्या वृत्ताला निरीक्षक पाटील यांनी स्वत: दुजोरा दिला आहे. गुन्हे शाखेत निरीक्षक हेमंत पाटलांची कामगिरी लक्षवेधी राहिली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा