Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
शहरातील रस्त्यांच्या क्राँक्रीटीकरणाचे कामे थांबवून ; जीर्ण झालेली पाईपलाईन बद्दलवावी - शिवसेनेचे निवेदन ...
शहरातील रस्त्यांच्या क्राँक्रीटीकरणाचे कामे थांबवून ; जीर्ण झालेली पाईपलाईन बद्दलवावी - शिवसेनेचे निवेदन ...
बोदवड:प्रतिनिधी:शहरातील नगरपंचायतीकडून रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामांना सुरुवात झाली आहे. परंतू , ग्रामपंचायतीच्या कार्यकाळातील जीर्ण झालेली पाईपलाईन न बदलवता हे काम सुरु आहे. पाईपलाईन लिकेजचे प्रकार मध्यंतरी वाढत आहेत. लिकेज जोडण्यासाठी बांधलेल्या नविन रस्त्यांना खोदावे लागत असल्याने क्राँक्रीटीकरणावर केला जाणारा शासनाचा खर्च वाया जात आहे.
या प्रकारावर शहरातील शिवसेनेचे अल्पसंख्यांक पदाधिकार्यांनी नाराजी दाखवत याविरोधात मुख्याधिकार्यांना निवेदन देत आंदोलनाचा ईशारा दिला आहे. सर्वप्रथम जीर्ण झालेली पाईपलाईन बदलवण्यात यावी व त्यानंतर रस्त्यांच्या क्राँक्रीट नुतनीकरणाचे काम करण्यात यावे अशी मागणी शिवसेना अल्पसंख्यांक ऊपजिल्हाप्रमूख कलीम शेख , नईम खान , समीर शेख यांनी केलीय.
शहरातील प्रभाग क्रमांक ११ मध्ये लिकेजला जोडण्यासाठी नुकत्याच बांधण्यात आलेल्या क्राँक्रीट रसत्याचे खोदकाम करण्यात आले आहे. यांवर परिसरातील नागरिकांनी तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. रस्त्यांच्या नुतनीकरणासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो परंतू , लिकेजला जोडण्यासाठी ह्याच रस्त्यांना खोदले जाते त्यावर डागडूजी व्यवस्थित होत नसल्याने नागरिकांना होणार्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्यामूळे नगरपंचायत तर्फे आधि जीर्ण पाईपलाईनचे नुतनीकरण करावे व त्यानंतरच रस्त्यांचे क्राँक्रीटीकरण करावे. असे न झाल्यास शासनाचा कोटींचा निधी खड्ड्यात जाणार असल्याचे शिवसेनेचे अल्पसंख्यांक ऊपजिल्हाप्रमूख कलीम शेख यांनी 'तरुण गर्जना न्युजशी' बोलतांना कळविले. नगरपंचायतीतर्फे निवेदनाचे लेखी ऊत्तर न आल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन करणार असल्याचे यावेळी त्यांनी कळविले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- दिंडोरी ( वणी ) : मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्याने प्राचीन तिळेश्वर महादेव मंदिर परिसर जलमय झाला. मंदिरात पुराचे प...
-
चिमठाणे प्रतिनिधी – प्रविण भोई धुळे–नंदुरबार महामार्गावरील चिमठाणे गाव शिवारातील दराणे फाट्याजवळ, पेट्रोलपंपाशेजारी सोमवारी सकाळी सुमारे ८ व...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा