Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
धुळे तालूक्यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी ट्रान्स फार्मर ( डी.पी) जळून बंद पडले असून ते ताबडतोब चालू व्हावेत अन्यथा विज वितरण कंपनी विरोधात तीव्र आंदोलन करु शिवसेना
धुळे तालूक्यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी ट्रान्स फार्मर ( डी.पी) जळून बंद पडले असून ते ताबडतोब चालू व्हावेत अन्यथा विज वितरण कंपनी विरोधात तीव्र आंदोलन करु शिवसेना
धुळे:प्रतिनिधी:धूळे तालुक्यातील बोरीस, बोरसुले, चिंचवार फीटर, चिंचखेडे, कुळथे ,चिंचवड, शिपाटे मोरशेवडी, फागणे, वरखेडे, कुंडाणे, ट्रान्स फार्मर जळून बंद पडले आहेत तसेच काही नादुरूस्त आहेत त्या बाबत तक्रारी करुन महिना उलटला तरी देखील संबंधीत गावांना ट्रान्स फार्मर दिले गेले नाहीत त्या त्या ठिकानच्या अधिकारी कर्मचारी यांनी नविन ट्रान्स फार्मर बसवण्या साठी रीपोर्ट देखील सादर केले आहेत खरतर ट्रान्स फार्मर जळाल्या पासून किंवा बिघाड झाल्यापासून तीन दिवसाच्या आत ते दुरुस्त किंवा नविन बसवले पाहिजेत त्या त्या गावातील शेतकरी बांधवांनी अनेकवेळा या बाबत तक्रारी केल्या नंतर देखील त्यांना प्रतिसाद मिळाला नाही, म्हणूण सदर शेतकरी बांधवांनी शिवसेना जिल्हा कार्यालयात तक्रारी केल्या त्याच्या तकारींची दखल घेवून महोदय आपल्याला फोनवरून ट्रान्स फार्मर लवकरात लवकर बसवण्या करीता विनंती केली होती ८ ते १० दिवस उलटल्या नंतर देखील आपण कार्यवाही केली नाही. निमडाळे गावाची डी.पी, कुंडाणे आदी गावांसह जिल्हाभरात अनेक गावाचे ट्रान्स फार्म ( डी.पी)
१ महिन्याच्या वर कालावधी जर टान्सफार्मर साठी शेतकरी हेलपाटे मारत असतील तर त्यांचे पिके जिवंत राहतील का ? आधीच त्यांना खरीप हंगामा साठी ओला दुष्काळ असा गंभीर सामना करावा लागला आहे त्यांना रब्बी पिकाच्या थोडाफार दिलासा मिळेल अशी आशा त्यांना त्यांच्या पिकांना शेती पंप चालू नसल्याने त्यांचे पिक ट्रान्सफार्मर जळाल्या मूळे धोक्यात आले आहे. तसेच कमी दाबाच्या विज पूरवठ्यामूळे आणि सूरळीत विज पूरवठा होत नसल्यामूळे देखील शेतकरी बांधव हैराण झाले असुन ते रोज कुठल्या ना कूठल्या महाविज वितरण कंपनीच्या ऑफीसवर मोर्चाने धडक देत असतात रब्बी पिकांना शेवटच्या टप्प्याचे पाणी मिळत नसल्याने ते जळू लागले आहेत ते टोकाचा विचार करतील अशा प्रकारे शेतकऱ्यांचा अंत पाहू नये. तरी शेती पंपाना योग्य विज पूरवठा व्हावा तोही दिवसा किंवा रात्री ठरल्या वेळेवर सूरळीत करावा आणि वरील गावांसह धूळे तालुक्यातील तसेच
जिल्हातील ज्या ज्या ठिकाणी ट्रान्स फार्मर (डी.पी) जळाल्या आहेत किंवा बंद आहेत त्या त्या ठिकाणी ताबडतोब ट्रान्स फार्मर बसवून शेतकरी बांधवांना दिलासा देण्यात यावा ह्या निवेदनाची ताबडतोब दखल न घेतल्यास येत्या दोन दिवसात आपल्या कार्यालयात विज वितरण कंपनी विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल. असे निवेदन विज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले असून या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख, हिलाल माळी, सुर्दशन पाटील, विलास चौधरी, बाबाजी पाटील, तुषार भामरे, प्रविण पाटील, सुधाकर पाटील, दिनेश देसले, गुताप धोबी, भास्कर सुर्यवंशी, बारकू पाटील, आदी उपस्थित होते
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...
-
संदीप अवधूत :- नाशिक ग्रामीण जिल्हयातील अवैध व्यवसायांचे समुळ उच्चाटन तसेच अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक नाशिक ग्...




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा