Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२०
वनविभागाकडून अग्नि प्रतिबंधक उपाय म्हणून जाळरेषा
सत्रासेन:प्रतिनिधी:चोपडा तालुका सत्रसेन वनक्षेत्रातील आगीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी वनविभागाच्या वतीने उपाययोजना केल्या जात आहेत. ऑस्ट्रेलियाच्या जंगलात लागलेल्या वणव्यासारखी घटना घडु नये म्हणून वन विभागाकडून अग्निप्रतिबंधक उपाय म्हणून जाळरेषा घेण्यात येत आहे.
वन विभागाच्या वतीने सत्रसेन येथील जंगलात जाळ रेषा घेतली जात आहे. जंगल चांगले असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गवत आहे.यंदा पाऊस चांगला झाल्याने गवत वाढलेले आहे. गवताला आग लागून झाडांसह वन्यजीवांना धोका निर्माण होऊ नये वन विभागाकडून दक्षता घेतली जात आहे.वनक्षेत्रामध्ये लागलेल्या आगीमुळे वन्यजीवांना धोका निर्माण होतो.
वेगवेगळ्या कारणांमुळे या आगीच्या घटना घडतात. काहीवेळा चिडून आग लावली जाते, तर काहीवेळा शेतकऱ्याकडून स्वतःच्या शेतात आग लावून बांध जाळले जातात. अशा ठिकाणाहून ठिणगी उडून वनक्षेत्रात आगी लागतात किंवा जंगलातील बांबूंचे घसरण झाल्यामुळे देखील आगी लागतात.
आगीच्या घटनांमुळे वनक्षेत्रातील गवत,झाडे जळू नयेत प्राण्यांना कोणती वीजा होऊ नये यासाठी वन विभागाकडून दक्षता घेतली जात आहे. जंगलातून जाताना नागरिकांनी काळजी घ्यायला हवी. चुकूनही आपल्यामुळे आग किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे दुर्घटना घडू नये यासाठी सर्वांनीच सावधगिरीने राहायला हवे. वाढलेले गवत हे पेट्रोल आणि डिझेल च्या बरोबरीने राहत असते. वाढलेल्या गवताला लागलेली आग विझवणे खूपच अवघड असते. वाऱ्यामुळे ही आग वाढत जाते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा