Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १६ फेब्रुवारी, २०२०

स्वामिनारायण मंदिरात, दामिनी पथकाची गस्त वाढविण्याबावत.





धुळे: शहरातील स्वामिनारायण मंदिर आता जागतिक तीर्थस्थळ आणि पर्यटक स्थळ बनलेले असुन. येथे रोज देश - विदेशाचे हरिभक्तांची आणि पर्यटकांची गर्दी होत असते.

या पवित्र, सांस्कृतिक, पर्यटक, अध्यात्मिक, सुसंस्कृत परिवार लाभलेल्या मंदिरामध्ये सकाळच्या सत्रामध्ये काही कॉलेजचे विद्यार्थी व विद्यार्थीनी येऊन अशोभनीय कृत्य करीत असतात त्यांचा विरोध
केल्यास शिवीगीळ व दादागिरीची भाषा करतात. त्यामुळे मंदिरातील येणारे भाविकांना व परिसरातील
नागरिकांना त्रास होत आहे व त्याचे रूपांतर वादविवादात होत असतात.

कृपया अशा चुकीच्या कृत्यांना आपले किभागाचे दामिनी पथकाद्वारे योग्य ती समज तथा कार्यवाही करण्यांत यावी त्यामुळे असे प्रकार परत घडणार नाही असे निवेदन पोलिस उप अधीक्षक,
श्री. रविंद्र सोनवणे यांना देण्यात आले यावेळी. रितेश बागुल, जतिन पंचाल, नंदकिशोर अग्रवाल, राजु पटेल, सुनिल चौधरी, आदी मान्यवर उपस्थित होते


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध