Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२०
तावखेडा खून प्रकरणी प्रेमिका महिलेसह दोघांना पाच दिवसाची पोलीस कोठडी
तावखेडा खून प्रकरणी प्रेमिका महिलेसह आरोपीस अटक शिंदखेडा पोलिसांच कामगिरी
शिंदखेडा:प्रतिनिधी: तालुक्यातील तावखेडा येथे बापू ओंकार रोकडे यांच्या शेतात सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास 27 वर्षाच्या प्रवीण पाटील या तरुणाचा मृतदेह सापडल्या प्रकरणी शिंदखेडा पोलिस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या पथकाने आरोपी महिलेसह एकाच अवघ्या 36 तासात अटक केली आहे दरम्यान शिंदखेडा न्यायालयात दोघांनाही हजर केले असता आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे शिंदखेडा तालुक्यात प्रेमी युगुलांच्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे
शिंदखेडा तालुक्यातील तावखेडा प्रण बेटावर या गावी 16 फेब्रुवारी रोजी गावातील प्रविण लोटन पाटील वय सत्तावीस या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता अधिक तपासात मयत प्रवीण पाटील याचा दोरीने गळफास केलेला असावा असा संशय पोलिसांना होता त्यानुसार सदर चे प्रेत धुळे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले होते दरम्यान जिल्हा रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालात त्याचा दोरीने गळफास केलेला असल्याचा अहवाल आल्याने पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली असता गुप्त माहितीच्या आधारे आधारे तपास करून प्रविण लोटन पाटील हा ग्रामपंचायतीमध्ये शिपाई म्हणून कार्यरत होता त्याचे गावातीलच शीतल प्रवीण पाटील यांच्याशी प्रेमसंबंध होते परंतु प्रवीण पाटील हात नेहमी तिच्याशी तिने लिहिलेल्या सुट्ट्या व्हाट्सअप वर टाकून बदनामी करीत असे वतीने लिहिलेल्या छोट्या तिच्या घरासमोर टाकत असे त्यामुळे गावातील लोकांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरू झाली होती 15 फेब्रुवारी रोजी प्रवीण पाटील याने शीतल पाटील ला अनेक वेळा मोबाईलद्वारे संपर्क साधून आज रात्री अंधारात गावाजवळच्या शेतामध्ये असे सांगून तिला बोलावून घेतले तिच्या दुसरा प्रियकर संभाजी यशवंत पाटील हादेखील त्यावेळी शेतामध्ये लपून राहिला होता यावेळी प्रवीण हा अगोदरच अर्धनग्न अवस्थेत शीतलची वाट बघत असताना दोघांना दोघांमध्ये जोराचे भांडण झाले व तिच्याशी अतिप्रसंग करत असताना प्रियकर संभाजी हा तेथे जाऊन दोघांचे हाणामारीत संभाजीने त्याच्या खिशातील महिलांची दोरी मयत प्रवीणच्या गळाला लावून त्याचा खून केला व शीतल व संभाजी यांनी दोघांनी त्याचे प्रेत कापूस पिकाच्या च्या शेतात शेतात फेकून दिल्याची कबुली आरोपी त्यांनी दिली आहे
त्यानंतर मयत प्रवीण पाटील याची मोबाईल पॅन्ट व कपडे व दोरीची विल्हेवाट लावून पलायन केले होते दोघाही आरोपींना समज देऊन गुन्हा कबुल केला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे घटनेचा तपास पोलीस अधीक्षक विश्वासराव पांढरे अप्पर पोलीस अधीक्षक राजू भुजबळ उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल मानेयांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी नायक पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे रफिक मुल्ला पोहेकॉ कैलास महाजन बिपिन पाटील विजय पाटील प्रियंका उमाळे हर्षल चौधरी प्रवीण निंबाळे दीपक बिल मोहन सूर्यवंशी आधी पोलिस विभागाचे कर्मचारी करीत आहेत
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...
-
संदीप अवधूत :- नाशिक ग्रामीण जिल्हयातील अवैध व्यवसायांचे समुळ उच्चाटन तसेच अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक नाशिक ग्...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा