Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२०

स्थानिक गुन्हे शाखा व धुळे पोलीसांची कामगिरी बुलेटवरून येऊन नागरिकांचे मोबाईल हिसकावणारा पोलीसांच्या जाळ्यात





धुळे:प्रतिनिधी:काही दिवसांपूर्वी नागरिकांचे मोबाईल हिसकावण्याचे प्रमाण वाढले होते शहरातील देवपूर पोलीस स्टेशन भाग ५ गु.र.नं. १३१/२०१९ भा.द.वि कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्हे दाखल झाले होते या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा, धुळे कडे चालू असताना दिनांक- १२/०२/२०२० रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, शिवाजी बुधवंत यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की बुलेटवरून येऊन नागरिकांचे मोबाईल हिसकावणारा रितीक उर्फ संधू अमरसिंग गोटे, रा. गुरूद्वाराचे मागे, उचाळे वस्ती, गुरूतेग बहाद्दर कॉलनी, धुळे ता.जि. धुळे याने त्याचा साथीदारांच्या मदतीने मोबाईल चोरी केल्याचे गोपनीय माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, शिवाजी बुधवंत यांनी पथकास आदेश देऊन त्यांचा शोध घेऊन तपास करण्याचे आदेश दिले.

त्यावरून गुन्ह्याचा तपास चालू असताना संशयित नामे रितीक उर्फ संधू अमरसिंग गोटे, वय-१९ वर्षे,रा. गुरूद्वाराचे मागे, उचाळे वस्ती, गुरूतेग बहाद्दर कॉलनी, धुळे ता.जि. धुळे यास पथकाने पाठलाग करून पांझरा चौपाटी येथे शिताफीने ताब्यात घेऊन विचारपूस करता त्याने त्याचे एका साथीदाराने मदतीने पाझरा चौपाटीवरून एका व्यक्तीचा फोनवर बोलत असताना त्याचेकड़न त्याचा मोबाईल हिसकावून
घेतल्याचे कबूल केल्याने त्याचेकडून एक सॅमसंग कंपनीचा गॅलॅक्सी ग्रॅण्ड निओ व गुन्ह्यात वापरलेली बुलेट गाडी असा एकूण १,१०,००० रू. (एक लाख दहा हजार ) किं चा मुद्देमाल ताब्यात घेतला असून. त्याचेकडून धुळे जिल्ह्यातील बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

वरील कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक सो, श्री. विश्वास पांढरे सो, अपर पोलीस अधीक्षक, डॉ. श्री. राजू भुजबळ सो यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. धुळे चे मा. पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बुधवंत व त्यांचे पथकातील पोलीस उप निरीक्षक- हनुमान उगले, पो.हे.कॉ. रफीक पठाण, संजय पाटील,पोना. प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, गौतम सपकाळे, राहुल सानप, कुणाल पानपाटील, उमेश पवार, रविकिरण राठोड, मुयर पाटील, अशोक पाटील, तुषार पारधी व किशोर पाटील अशांनी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध