Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
दुसऱ्या आंतरराष्ट्रीय मानांकन बुध्दीबळ स्पर्धेचा देवरे अभियांत्रिकीत शानदार समारोप, विजेत्यांनी केली बक्षिसाची लयलूट,
दुसऱ्या आंतरराष्ट्रीय मानांकन बुध्दीबळ स्पर्धेचा देवरे अभियांत्रिकीत शानदार समारोप, विजेत्यांनी केली बक्षिसाची लयलूट,
धुळे:प्रतिनिधी: दि 12 फेब्रुवारी :- गत सहा दिवसापासून शहरातील श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या बापूसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरू असलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय मानांकन बुध्दीबळ स्पर्धेचा आज महाविद्यालय सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार समारोप झाला.
देश विदेशातील दोनशे सात खेळाडूंच्या सहभागाने स्पर्धेत रंगत आणली व महाविद्यालय परिसरात चैतन्याचा व उत्साहाचे वातावरण अनुभवले गेले. या स्पर्धेत कोल्हापूर येथील आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त खेळाडू सम्मेद जयकुमार शेट्ये सर्वसाधारण विजेता ठरला त्यास रुपय 31000/- रोख पारितोषिक स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले तसेच या स्पर्धेत गुणतालिकेनुसार सर्वसाधारण गटात भारतीय रेल्वे चे आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त खेळाडू विक्रमादित्य कुलकर्णी यास रुपये 20000/- चे द्वितीय पारितोषिक मिळाले, तसेच महिंद्रकर इंद्रजीत ने रुपये 15000 /- चे तृतीय पारितोषिक मिळवले,
बांगलादेश चा अहमद फिरोज चौथ्या स्थानावर विजयी झालेत, आव्हाड प्रज्वल पाचव्या, पाटील रोहित सहाव्या, लोहकरे प्रथम सातव्या स्थानावर, बोरसे पंकज आठव्या क्रमांकावर,लामकाने ओम नवव्या, व आदित्य सावलकर दहाव्या क्रमांकावर विजेते ठरले. तसेच 1700 पेक्षा कमी मानांकन गटातून उमेर एस एम ने रुपये 21000/- चे प्रथम व भागवत हेरंब ने रुपये 11000/-चे द्वितीय व धनश्री राठी ने रुपये 7000/- चे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. तसेच 1400 पेक्षा कमी मानाकन गटातून संजय कुमार मित्तल ने रुपये 2100/- चे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले, विजय चौहान ने रुपये 10000 /- चे द्वितीय व बिर सिंग रमिंदर ने रुपये 7000 /- चे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. महाविद्यालयाचे, उपाध्यक्ष डॉ संजय पाटील, प्राचार्य डॉ हितेंद्र पाटील, अखिल मराठी बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव शोभराज खोंडे, धुळे जिल्हा अध्यक्ष डॉ गुंजन पाटील, शैलेंद्र कोंडे, स्पर्धा समन्वयक प्रा. योगेश रवंदळे, रजिस्ट्रार प्रा कुणाल पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. पारितोषिक वितरण समारंभात प्रथम 75 खेळाडूंना 2.55 लाख रुपयांची रोख बक्षिसे, स्मृतिचिन्ह, तसेच प्रमाण पत्र मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. डॉ संजय पाटील यांनी बुध्दीबळ हा खेळ प्रेक्षक नसलेला खेळ असून जास्तीत जास्त खेळाडूंनी या खेळाचा प्रचार व प्रसार करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले तसेच शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमात नियमित खेळ म्हणून बुध्दीबळाची गणना होण्यासाठी बुध्दीबळ संघटनेने शासनस्तरावर पाठपुरावा करावा असे प्रतिपादन केले. तसेच बुध्दीबळाने मनाची एकाग्रता वाढून स्मरणशक्ती वृध्दीसाठी सहाय्यक असल्याचे मत मांडले. शोभराज खोंडे यांनी संपूर्ण सहा दिवसांत बुध्दीबळ स्पर्धेचे सुंदर व निटनेटके नियोजन केल्या बद्दल देवरे अभियांत्रिकी महाविद्यालय व्यवस्थापनाचे विशेष आभार मानले व बुद्धीबळाच्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत
प्रसार करण्यासाठी प्रयत्नशील रहाण्याची ग्वाही दिली. प्राचार्य डॉ हितेंद्र पाटील यांनी मनोगतातून स्पर्धेच्या आयोजना मागील संकल्पना विशद केली व दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय मानांकन बुध्दीबळ स्पर्धेचे संयोजन करण्याची संधी मिळाल्या बद्दल आनंद व्यक्त केला व यशस्वा खेळाडूंचे मनापासून अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. रजिस्ट्रार प्रा. कुणाल पाटील यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.
मुख्य समन्वयक प्रा योगेश रवंदळे यांनी आभार प्रदर्शन केले. अध्यक्ष. सुभाष दादा देवरे व प्राचार्य. डॉ. हितेंद्र पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनात स्पर्धेचे मुख्य समन्वयक प्रा. योगेश रवंदळे सिनियर नॅशनल आर्बीटर, तसेच प्रा. गौरव पाटील स्टेट आर्बीटर, प्रा. कुणाल पाटील ,प्रा विनोद शिंदे, प्रा.जितद्र व्यास, प्रा रामकृष्ण पाटील आनंद कलकर्णी, प्रा. निखिल देशमुख, प्रा. मच्छिंद्र गदे, प्रा.भूषण माळी, प्रा धीरज जाधव, प्रा मयुर अग्रवाल, प्रा. प्रवीण ठाकरे, प्रा.विजय तवर, प्रा. किरण मोरे, प्रा. पल्लवी साळुखे, प्रा. हेमंत कुवर, प्रा. रिमा कालडा, प्रा. शैलेश चव्हाण यांनी स्पर्धेचे संयोजन केले त्यांना प्रांजल गुरव, नयन चौधरी, जान्हवी पाटील, प्रणव डेरे, तुषार येवलेकर, आसापुरे, रिशीता राठोड, मुस्कान कटारिया यांनी सहाय केले. या स्पर्धैसाठी गौतम क्लासस धुळे यांचेही महत्त्वाचे सहकार्य लाभले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा