Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२०
जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे ग्रामीण जनतेला न्याय देतील का ?
शिवाजी पारधी (प्रतिनिधी)
अधिकाऱ्यांकडून ,प्रसारमाध्यमांकडून सामान्य माणसांचा आणि तळागळातल्या माणसांचा
उल्लेख वारंवार होतो.या माणसांसाठीच संपुर्ण यंत्रणा राबते आहे असा आभास निर्माण
केला जातो.पण प्रत्यक्षात फाईलवर निर्णय घेतांना त्या सामान्य माणसाच्या किंवा
तळागळातल्या माणसाच्या हिताचा कुठे मागमुसच नसतो.”शिकायचं एक आणि वागायचं वेगळ
”हे नोकरीतले ब्रीदवाक्य आहे .आणि जिल्ह्यातील जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे जनतेशी
तश्याच प्रकारे वागत आहेत. त्यांच्या आचरणांत सर्वसामान्यांपेक्षा राजकीय लोकांचा
कळवळा जास्त आहे . जोपर्यंत सर्वसामान्य लोकांना तुम्ही आपले वाटत नाहीत तोपर्यंत
त्यांचा विश्वास व विकास साधता येणार नाही. शासनाच्या अनेक योजना जनकल्याणासाठी असतात हे
खरे पण ते कल्याण जनसामान्यांचे नसून राजकारण्यांचे आणि काही ठराविक अधिकाऱ्यांचे
होते असेच वारंवार सिद्ध होत आहे.“जिसकी लाठी उसकी भैस
” म्हणजे
ज्याच्या हातात अधिकार तो लोकांचे भवितव्य ठरवणार असा शासकीय कारभार सध्या
जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ.अविनाश ढाकणे यांचा
चालला आहे .
दहिवद येथील रेशन भ्रष्टाचार करणाऱ्या रेशन
दुकानदार यांच्यावर जिवनावश्यक वस्तू अधिनियम कलम ३ व ७ नुसार गुन्हा दाखल
करण्याचे आदेश ६ फेब्रुवारी २०२० रोजी अमळनेर तहसिलदार
मिलिंद वाघ यांनी दिले होते. जिल्हाधिकारी यांनी पदाचा दुरुउपयोग करत जिल्ह्यातील
संकट मोचन ज्यांची अजूनही सत्तेची नशा गेली नाही असे यांच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल करण्यास
ब्रेक लावला आहे .
जळगांव जिल्ह्याच्या पदभार सांभाळल्या नंतर रेशन प्रणालीत
पारदर्शकता आणा असे अधिकारी /कर्मचारी
यांना सुचना देणारे डॉ.अविनाश ढाकणे गेलेत तरी कुठे ? हाच का त्यांचा पारदर्शक
कारभार ? “सांगायचं एक व करायचं दुसर “ असे वागणारे अधिकारी जोपर्यंत या देशात
आहेत तोपर्यंत भ्रष्टाचाराचे मुळ या देशातून जाणार नाहीत.
या सर्व राजकीय नाट्यात तक्रारदार पंकज पाटील यांनी संपुर्ण कागदपत्रांसह आझाद
मैदानावर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमरण
उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.त्यांनी
मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे ,अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ व राज्यमंत्री
लोकनायक बच्चू कडू, स्थानिक आमदार अनिल पाटील यांच्याकडे पुराव्यानिशी तक्रार केली असून मुख्यमंत्री
यांच्या कार्यालयातून त्यांच्या तक्रारीनुसार कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. येत्या
अधिवेशनात अमळनेर तालुक्यातील रेशन भ्रष्टाचारावरून वादळ उठणार असल्याचे संकेत
स्थानिक आमदार यांनी दिले आहेत. गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणाऱ्या अधिकारी
कर्मचारी यांच्यावर शिस्तभंग विषयक कारवाईची मागणी देखील तक्रारदार पंकज पाटील
यांनी केली आहे.
ज्यांनी
राजकारण्यांशी हातमिळवणी केली तेच तरले .बाकीचे संपून गेले: हा महाशक्तीचा खेळ
आहे.या महाशक्तीला जिल्हाधिकारी/अधिकारी ,कर्मचारी बळी पडतील का ? समाजातील ग्रामीण जनतेच्या
सर्वांगीण विकासासाठी जिल्हाधिकारी यांनी
शासकीय यंत्रणेला कामाला लावणे गरजेचे आहे . समाजातील शेवटच्या माणसापर्यंत लाभ
तेव्हाच पोहचू शकतो जेव्हा प्रत्येक अधिकारी प्रामाणिक काम करेल . या सर्व
शासकीय योजना जिल्हाधिकारी प्रामाणिक पणे राबवतील का ? का मध्यावर सोडून देतील ? त्यांनी दिलेल्या
आदेशांचे पालन कर्मचारी करतील का ? रेशन भ्रष्टाचार
करणाऱ्याला शिक्षा करून जिल्हाधिकारी ग्रामीण जनतेला न्याय देतील का ?......असा
सूर सर्वसामान्य लोकांच्या बोलण्यातून व्यक्त होत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा