Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ८ फेब्रुवारी, २०२०
Home
/
सामाजिक
/
महाराष्ट्र राज्य विरशैव लिंगायत गवळी समाजाचा प्रथम भव्य वधु-वर पालक परिचय मेळावा उत्साहात झाला संपन्न
महाराष्ट्र राज्य विरशैव लिंगायत गवळी समाजाचा प्रथम भव्य वधु-वर पालक परिचय मेळावा उत्साहात झाला संपन्न
धुळे:प्रतीनिधी:दि ०८ फेब्रुवारी शहरातील संतोषीमाता चौकातील कल्याण भवनात आज शनिवारी दुपारी महाराष्ट्र राज्य विरशैव लिंगायत गवळी समाज तर्फे वधु-वर परिचय मेळावा याचे आयोजन धुळ्यात करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन दिपप्रज्वलनाने झाले
यावेळी व्यासपिठावर किसन जोमिवाळे, राजेंद्र पंगुडवाले, राजेंद्र गठरी, शिवाजी बाचलकर, महादू उदिकर, शकर लगाट, अनिल जोमिवाळे, विठठल उन्हाळे, रमेश दहिहांडे, दौलत अनजाने,
अर्जुन थादबोले, रमेश यमगवळी, बालू घुगरे, शिवाजी यादबोले, राजेंद्र बिडकर, दिनेश अंजाने, तानाजी घुगरे, संजय घुगरे, प्रकाश यमगवळी, नंदू झिपरे, तानाजी बाचलकर, नीना गोडळकर, सुरश यादबोले, भटू घटी, साईनाथ अंजिखाने उपस्थित होते मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी राजेंद्र गंगाराम गठरी ( खजिनदार ) यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण आहे. तसेच तो एक पवित्र धार्मिक व सामाजिक संस्कार देखील ठरतो.उत्तर महाराष्ट्रात धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यात आपला विरशैव लिंगायत गवळी समाज मोठ्या प्रमाणात असून ठिकठिकाणी विखुरलेला आहे. वधु-वर परिचय मेळावा काळाची गरज आहे मेळाव्यातून नाती जुळून येतात आजच्या धावपळीच्या जीवनात लग्नाच्या उंबरठ्यावरील मुला-मुलींच्या पालकांना अपेक्षित स्थळे शोधण्यासाठी आर्थिक परिस्थिती व वेळेअभावी त्रासदायक झाले आहे.
म्हणून उत्तर महाराष्ट्रातील सर्व समाजातील प्रत्येक व्यक्तीने स्वत:पासून करायला हवी समाजातील बांधवांची अडचण दूर करण्यासाठी हा सामाजिक उपक्रम दरवर्षी राबविण्याचे ठरविले आहे.तरी आपणा सर्वांना नम्र निवेदन की, धुळे नगरीत प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात आपण स्वत आपल्या विवाह योग्य मुला-मुलींसह नाव नोंदणी करुन सहभागी व्हावे व संपर्कातील सर्व समाज बांधवास पुढिल मेळाव्यात सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित करुन मेळावा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे
या मेळाव्यात तरुण,तरुणींनी आपला परियच करून दिला वधु-वर परिचय मेळाव्यात एकुण ५०० वधुवराची उपस्थिती होती यात १५० मुलीं तर ३५० मुल होती यावेळी मोठ्या संख्येने विरशैव लिंगायत गवळी समाजातील स्ञी,पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
सामाजिक
Tags
सामाजिक
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा