Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ८ फेब्रुवारी, २०२०

कुरखळी येथील युवकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेने अपघाती मृत्यू



कुरखळी:प्रतिनिधी:योगेश्वर मोरे: मुंबई आग्रा महामार्गावर कुरखळी फाटाच्या सुरुवातीला 300 मीटर अंतरावर दि.७ फेब्रुवारी रात्री ११. ३० च्या सुमारास कुरखळी येथील रहिवासी जितेंद्र लोटन कोळी वय २८ याचा दुचाकीला अज्ञात वाहनाच्या धडकेने अपघाती मृत्यू झाला. 

सविस्तर वृत्त असे की, शिरपूरकडुन मुंबई - आग्रा हायवे वरून कुरखळी च्या दिशेने दुचाकीवरून येत असतांना शिरपूर - पळासनेर टोलवे ते कुरखळी फाटा दरम्यान रात्रीच्या वेळी एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने डोक्याला जबर मार लागून जागीच मृत्यू होऊन रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जितेंद्र लोटन कोळी. रा. कुरखळी ता. शिरपूर याला टोलवे प्रशासनाच्या रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. दि ८ रोजी सकाळी 11. 00 वाजेच्या सुमारास डॉ. कल्पेश वाघ यांनी मृत जितेंद्र कोळी याचे शवविच्छेदन करून त्यांस अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात दिले. या अपघाताबाबत उपजिल्हा रुग्णालय शिरपूर यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार शिरपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जितेंद्र याच्या पश्चात आई - वडील, पत्नी, दोन मुलं, भाऊ असा परिवार आहे. जितेंद्र च्या अपघाती मृत्यूने नातेवाईक तसेच कुरखळी गावावर शोककळा पसरली आहे. अवघा २८ वर्षाच्या जितेंद्र ज्याने अजून पूर्ण प्रपंच देखील पाहिलेला नव्हता. पत्नी व दोन मुलांसोबत भाऊ व आई - वडील यांची जबाबदारी त्याच्यावर होती. असं अचानक आपल्यातून निघून जाण्याने त्याची उणीव भरून येणं शक्य नाहीच परंतु कमी वयात पत्नी व दोन मुल, तसेच भाऊ व आई - वडीलांना त्यांची कमतरता भासणं स्वाभाविक आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध