Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ९ फेब्रुवारी, २०२०

जि.प.सदस्य पती रेशन दुकानदार रमेश काशिनाथ पाटील दहिवद यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे तहसिलदार मिलिंद वाघ यांचे आदेश


BY ऑनलाईन तरुण गर्जना ०९ फेब्रवारी , २०२०

शिवाजी पारधी  (प्रतिनिधी)

  • अमळनेर तालुक्यात आतापर्यंत तीन रेशन दुकानदारांवर गुन्हे दाखल .
  • तालुक्यात रेशन भ्रष्टाचाराचीमिलीभगत   .

अमळनेर तालुक्यात रेशन भ्रष्टाचाराचे वादळ दहिवद गावापासून उठले. २०१६ पासून रमेश काशिनाथ पाटील यांचे रेशन दुकान औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या रिट पिटीशन ९८२८/२०१६ आदेशाने  श्यामकांत उर्फ पंकज पाटील यांच्या याचिकेमुळे रद्द करण्यात आले होते .

 रमेश काशिनाथ पाटील यांनी मयत अंत्योदय लाभार्थींच्या नावाने २२४० किलो  रेशन धान्य उचल करून गडप केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते  पंकज पाटील यांनी प्रशासनाकडे  केलेली होती गुन्हा दाखल होत नसल्याने त्यांनी आतापर्यंत अमळनेर तहसील कार्यालयासमोर चार वेळा उपोषण केले व २६ जानेवारी २०२० रोजी देखील त्यांनी उपोषणाचा इशारा प्रशासनाला दिला होता परंतु आमदार अनिल पाटील यांच्या मध्यस्थीने ते उपोषण मागे घेण्यात आले होते.

 रमेश काशिनाथ पाटील यांच्या पत्नी मीनाबाई रमेश पाटील या जिल्हापरिषद सदस्य असल्याने त्यांच्यावर राजकीय प्रभावापोटी गुन्हा दाखल होत नव्हता .तक्रारदार पंकज पाटील यांनी नवनिर्वाचित आमदार अनिल पाटील यांच्याकडे संपूर्ण कागदपत्रांसह पुराव्यानिशी तक्रार केली होती.त्या तक्रारीच्या अनुषंगाने अनिल पाटील यांनी अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे मौजे दहिवद येथील रेशन दुकानांत  झालेला सर्व गैरकारभार उघड केला .मा.मंत्री महोदय यांनी तात्काळ चौकशीचे आदेश देत योग्य ते कार्यवाही करण्यात यावी असे सांगितले .

 जिल्हा तक्रार निवारण अधिकारी जिल्हाधिकारी जळगांव यांच्याकडे पंकज पाटील यांनी तक्रार केली होती. त्यानुसार जिल्हा विधी अधिकारी यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी  यांना त्वरित व तात्काळ गुन्हा दाखल करण्यास सांगितले .जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी अमळनेर तहसिलदार यांना यथोउचीत कार्यवाही करण्याकामी प्राधिकृत करण्यात आले आहे  .अमळनेर तहसिलदार मिलिंद वाघ यांनी पुरवठा निरीक्षक राजेंद्र साळुंखे यांना रमेश काशिनाथ पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याकामी ६ फेब्रुवारी २०२० रोजी आदेशित केले आहे.


“तालुक्यात स्वस्त धान्याचा गैरव्यवहार करणाऱ्या दुकानदारांना  नियमानुसार शासन होईलच .त्यासाठी आपण पाठपुरावा करू .याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास विलंब करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांची गय केली जाणार नाही.”
आमदार अनिल पाटील ,अमळनेर


गरिबांच्या हक्काचे रेशन चोरून स्वतःची घरे भरनाऱ्या भ्रष्ट  रेशन  दुकानदारांच्या विरोधात माझा लढा असून माझा न्याय व्यवस्थेवर पुर्ण विश्वास आहे.”
वृक्ष मित्र पंकज पाटील ,तालुका अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष ,अमळनेर  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध